नागाला केलं ठार, नागिणीने घेतला सूड, २६ जणांना दंश

नागाला केलं ठार, नागिणीने घेतला सूड, २६ जणांना दंश

आजपर्यंत आपण नागिण बदला घेते हे एखाद्या चित्रपटात बघितलं होतं. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच घटना घडली आहे. बदला घेण्यासाठी एका सापाने एक नव्हे २६ जणांना डसले आहे. ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर ही सत्य घटना आहे. उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नाग पंचमीच्या दिवशी नाग मारल्यामुळे संतप्त नागिण आता परिसरातील लोकांना डसत असल्याची घटना घडली आहे.

कारण सध्या शेतात पूर आल्याने अनेक विषारी साप बाहेर पडत आहेत. शंकरपूर, चिलबिला, बेलभरिया यासह काही खेड्यांमध्ये सापाने २४ हून अधिक ग्रामस्थांना तर सहा जनावरांना डसले आहे. तर शंकरपुरात जनावरांना खायला घालत असलेल्या इबरार यांना रविवारी सर्पदंश झाला. ते त्यातून बचावले.

यानंतर दोन दिवसांत संदीप, गुलाबी देवी, शीला देवी, माया देवी, ढाल्ला, नेहा, धर्म प्रकाश, विपिन, चिराकू, भागीरथ यांची पत्नी नगरीया, बैधे, पवन यासह २६ गावकऱ्यांना सापाने चावा घेतला. त्यापैकी रविवारी मुनीशकुमार यांचा मृत्यू झाला. नाग पंचमीच्या दिवशी ग्राम मंदिरात राहणाऱ्या सापाच्या जोडप्याताल नागांना ग्रामस्थांनी ठार मारल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तेव्हापासून संतप्त सर्पाने गावात दहशत निर्माण केली आहे.

पीडितांनी सांगितले की, त्यांना झोपताना साप चावल्यासारखे वाटते, परंतु त्यांना सर्प दिसला नाही. सध्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील लोक आपाल्या मुलांना नातेवाईकांकडे पाठवत आहेत.

First Published on: August 5, 2020 4:59 PM
Exit mobile version