मृत्यूशी झुंजणाऱ्या आईला ५० हजारात विकायची आहेत मुलं

मृत्यूशी झुंजणाऱ्या आईला ५० हजारात विकायची आहेत मुलं

मृत्यूशी झुंजणाऱ्या आईला ५० हजारात विकायची आहेत मुलं

आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर आपल्या पाठिमागे आपल्या दोन लहान मुलांचं काय होईल? असा प्रश्न बिहारच्या नालंदा येथील रुग्णालायत क्षयरोगानं त्रस्त असलेल्या महिलेला सतावत आहे. तिच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. परंतु, या अवस्थेतही तिला पोटच्या दोन मुलांची चिंता सतावत आहे. त्यामुळे तिनं आता आपली पोटची दोन्ही मुलं विकण्याचा निर्णय घेतला आहे. ती आपल्या दोन्ही मुलांना ५०-५० हजारांमध्ये विकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, याबाबतची माहिती जेव्हा रुग्णालय प्रशासनाला कळली तेव्हा वाऱ्यासारखी ही बातमी देशभरात पसरली. अखेर ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाचे अधिकारी ताबडतोब रुग्णालयात गेले आणि त्यांनी तिची चौकशी केली. प्रशासनाकडून तिला उपचारासाठी मदत केली जाणार आहे.

हेही वाचा – मुंबईसह १५ शहरांमध्ये ‘हाय अलर्ट’

काय आहे नेमके प्रकरण?

क्षयरोगाला कवटाळलेल्या या महिलेचे नाव सोनम असे आहे. ती बिहारच्या पटना जिल्ह्याची आहे. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न नालंदाच्या सुमंत कुमार यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सुमंत कुमार यांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी सोनमने दुसरे लग्न केले. काही महिन्यांपूर्वी सोनमला क्षयरोग झाल्याचे निदान झाले. तिने आपल्या पतीला इलाजासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याची विनवणी केली. मात्र, पतीने तिच्या विनवणीकडे पाठ फिरवून तिला सोडून दिले. महिलेकडे इलाजासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने आजार अंगावर घेतला. अखेर प्रकृती जास्त बिघडली. या महिलेला सहा महिन्यांचा एक आणि दोन वर्षांचा एक असे दोन लहान मुले आहेत. या दोन्ही मुलांना ५०-५० हजारांमध्ये विकण्याचा निर्णय तिने घेतला होता. मात्र, याबाबत सर्वत्र माहिची पसरल्यानंतर प्रशासन तिच्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे तिला प्रशासनाकडून योग्य ती मदत केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

First Published on: August 13, 2019 9:26 AM
Exit mobile version