राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनीने काल रात्री तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनी वेल्लोर तुरूंगात असून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रात्रीच्या सुमारास साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नलिनीचे वकील पुगलेंती यांनी याबाबत माहिती दिली.

राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी गेल्या २९ वर्षापासून जेलमध्ये आहे. नलिनीने पहिल्यांदाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये नलिनी आणि कैदी यांच्यात भांडण झाल्याचं वकिलाने सांगितलं. नलिनीचं जिच्यासोबत भांडण झालं ती देखील जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या भांडणाबद्दल त्या कैदीने जेलरकडे तक्रार केली, त्यानंतर नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती नलिनीच्या वकिलाने दिली. वकिलांनी सांगितलं की नलिनीने यापूर्वी कधीही असा प्रयत्न केलेला नव्हता. त्यामुळे याचं खरं कारण जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुगलेन्ती म्हणाले की, नलिनीचे पती मुरुगनही राजीव गांधी हत्या प्रकरणात तुरूंगात आहे. नलिनीला वेल्लोर तुरूंगातून पुजळ कारागृहात हलविण्याची विनंती केली आहे. मुरुगनची ही मागणी न्यायालयात मांडली जाईल असे वकील पुगलेंती यांनी सांगितलं.

 

First Published on: July 21, 2020 11:21 AM
Exit mobile version