आयफोन हवा तर नमाज पठण कर

आयफोन हवा तर नमाज पठण कर

प्रातिनिधिक फोटो

मुस्लिम बांधव दररोज नमाज पठण करतात. त्यांचे धर्मग्रंथ कुरानमध्ये नमाजाचे रोज पठण गरजेचे असल्याचे सांगितले आहे. मात्र मलेशियात एका मुलीने आपल्या आई वडिलांशी एक वेगळाच करार केला आहे. आय फोन मिळवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या करारामध्ये १२ अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये दररोज नमाज पठण करणे आणि डायनिंग टेबलवर आयफोन न वापरणे अशा अटी आहे. जर ही मुलगी कोणत्याही अटींचे उल्लंघन करत असेल तर तिच्या जवळील आयफोन वडिलांकडे सोपवण्यात येईल असे म्हटलं आहे.

दहा वर्षाच्या मुलीने करार

‘डेली मेल’ या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार करार करणाऱ्या मुलीचे वय फक्त दहा वर्ष आहे. यासमीन असे या मुलीचे नाव आहे. आपल्या कुटुंबाबरोबर जेवताना, बाहेर फिरते वेळी, चित्रपट दरम्यान मोबाईल वापरु शकत नाही. या कराराला ‘वन इयर रिन्युएबल फोन लोन काँट्रेक्ट’ असे नाव देण्यात आले आहे. यासमीन आपल्या आई वडिलांच्या मोबाईलला देखील हाथ लावू शकत नाही.

इंटरनेटचा वापर मर्यादित 

करारानुसार आयफोन मिळाल्यानंतर यासमिन इंटरनेचा वापर करु शकेल. मात्र तिला एक ठराविक मर्यादा दिली आहे. मात्र जर इंटरनेटचा प्लान संपला तर यासमिन फोन रिचार्ज नाही करु शकणार. जर यासमिनने असे केले तर तिचा फोन पालकांकडून घेतला जाईल. या फोनची बॅटरी संपल्यावरच ती चार्ज करु शकणार आहे.

First Published on: December 12, 2018 9:29 PM
Exit mobile version