शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

देशभरातील सरकारने जाहिर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि देशातील इतर राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. मी पण एक शेतकरी आहे. देशात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले ते अगदी योग्य आहे असे म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

देशात जे शेतकरी आंदोलन सुरू आहे ते अगदी योग्य आहे. ही लढाई आत्मसन्माची लढाई नसून देशाच्या अन्नदात्याच्या अधिकाऱ्याची लढाई आहे. त्यामुळे देशभरातील अन्नदाता थंडीच्या दिवसात कोरोना सारख्या माहामारीत कशाचीही पर्वा न करता कृषीकायद्याविरोधात ते आंदोलन करत आहेत. करोडोच्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की, तुम्ही शेतकऱ्यांची समस्या लक्षात ठेवून शेतकऱ्यांच्या विरोधात केलेला हा काळा कायदा मागे घ्याल अशी मला पूर्णपणे खात्री आहे, असे नाना पटोले यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.

त्याचबरोबर त्यांनी पुढे असेही लिहिले आहे की, जर तुम्ही हा कायदा मागे नाही घेतला तर, संविधान पदाची जबाबदारी असली तरी एक शेतकरी नात्याने मला अन्नदात्यांच्या या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल. माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की, अधिक उशिर न करता शेतकरी विरोधात जाहिर केलेला हा कायदा त्वरित मागे घ्यावा, असे नाना पटोलेंनी आपल्या पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोधात देशभरात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत आंदोलन केले. केंद्र सरकराने जाहीर केलेले कृषी कायदे मागे घेण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. देशभरात या आंदोलनाचे पडसाद उमटले. या कायद्यावर अद्याप निर्णय निघाला नसून याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून इशारा दिला आहे.


हेही वाचा – यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द

First Published on: December 15, 2020 3:08 PM
Exit mobile version