Modi cabinet expansion: मोदी मंत्रीमंडळात ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Modi cabinet expansion: मोदी मंत्रीमंडळात ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सरकारचा २०१९ नंतरचा पहिलाच मंत्रीमंडळ विस्तार आज बुधवारी रामनाथ कोविंद यांच्या साक्षीने पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकुण ४३ नव्या चेहऱ्यांना पसंती दिली गेली. मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपदाची सर्वात प्रथम नारायण राणे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली गेली. आज बुधवारी राष्ट्रपती भवनात दरबार हॉल येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात मंत्रीपदाची शपथ नारायण राणे यांना देण्यात आली. त्यासोबतच आणखी खासदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील यांनीही मोदी मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेतली. मराठवाड्यातील खासदार डॉ भागवत कराड यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मोंदीच्या नव्या मंत्रीमंडळात एकुण ४३ तरूण मंत्र्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशा दोन पद्धतीची शपथ देण्यात आली.

नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

 

मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात कोण नवे चेहरे ?

नारायण राणे, सरबनंदा सोनोवाल, डॉ विरेंद्र कुमार

ज्योतिरादित्य सिंधीया, रामचंद्र सिंह, अश्विनी वैष्णव

पशुपती कुमार पारस, किरेन रिज्जू, राज कुमार सिंह

हरदीप सिंह पुरी, मनसुख मालवीय, भुपेंदर यादव

परशोत्तम रूपाला, जी कृष्ण रेड्डी, अनुराग ठाकुर

 

पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्य पाल सिंह बघेल

राजीव चंद्रशेखर, शोभा करंदजले, भानू प्रताप सिंह वर्मा

मिनाक्षी लेखी, दर्शना जरदोश, अनुपमा देवी

ए नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट

बी एल वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह

भगवाननाथ खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक

सुभाष सरकार, भागवत कराड, राजकुमार सिंह

भारती पवार, विश्वेश्वर तुडू, शंतनू ठाकुर

मुंजापारा महेंद्रभाई, जॉन बारला, एल मुरूगन, निशिथ प्रामाणिक

First Published on: July 7, 2021 6:20 PM
Exit mobile version