नरेंद्र मोदी आणि गोडसे एकाच विचारसरणीचे- राहुल गांधी

नरेंद्र मोदी आणि गोडसे एकाच विचारसरणीचे- राहुल गांधी

राहुल गांधी

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे एकाच विचारसरणीचे आहेत. त्यांच्या विचारांमध्ये काहीही फरक नाही. पण गोडसेंबद्दल आस्था आहे हे सांगण्याची मोदींमध्ये हिंमत नाही असा आरोपच राहुल यांनी वायनाड य़ेथील रॅलित केला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात वायनाड येथे संविधान बचाव रॅलिचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रॅलिला संबोधित करताना राहुल यांनी मोदी आणि गोडसे एकाच विचारसरणीचे आहेत. असे म्हटले. तसेच भारतीय जनतेला ते या देशाचे नागरिक आहेत हे सिद्ध करावे लागत आहे. माझे भारतीयत्व ठरवणारे मोदी कोण लागून गेलेत. मी भारतीय आहे की नाही हे ठरवण्याचा परवाना त्यांना कोणी दिला. असा सवाल करत राहुल यांनी मी भारतीय आहे हे सिद्ध करण्याची मला काहीच गरज नाही. असेही ठणकावून सांगितले.

यावेळी रोजगार आणि देशाच्या सद्य अर्थव्यवस्थेवरूनही राहुल यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तुमच्या हे लक्षात येतय का की तुम्ही जेव्हा मोदींना बेरोजगारी आणि नोकरी यांच्याबद्दल प्रश्न विचारता तेव्हा ते या मुद्द्यावरून तुमचे लक्ष ह    ण्याचा प्रयत्न करतात. सीएए आणि एनआरसी काही तुम्हांला नोकऱ्या देणार नाहीयेत. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती आणि आसाममधील अस्थिरताही तुम्हाला रोजगार मिळवून देणार नाहीये. असे सांगत राहुल यांनी यावेळी मोदी सरकारला सीएएवरून घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच भारत आपला मार्गच विसरला आहे. एकेकाळी विविध संस्कृती व धर्मासाठी जगभरात ओळखला जाणाऱ्या भारतात जनता आता आपसात भांडत आहेत. असे परदेशात भारताबद्दल बोलले जात असल्याचे राहुल यांनी यावेळी संगितले. तसेच कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या सारख्या विचारवंतांच्या हत्या होत आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. देशाची अर्थव्यव्यवस्था ढासळतेय असे सांगत राहुल यांनी यावेळी मोदी सरकारवर शरसंधान साधले.

First Published on: January 30, 2020 2:13 PM
Exit mobile version