देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर हल्लबोल केला आहे. देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देश लॉकडाऊनचं पालन करत होतं. तसेच जागतिक आरोग्य संघटना संपूर्ण जगाला सल्ला देत होती की, जो नागरिक ज्या ठिकाणी आहे. त्याने त्या ठिकाणी निवास करावा. संपूर्ण जगात हा संदेश दिला जात होता. त्यावेळी काँग्रेसने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मजुरांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोस्ताहित केलं. तसेच तेथील मजुरांना मोफत तिकिटं वाटण्यात आली. मुंबई सोडून जाण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रावरील भार कमी करण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. कोरोना काळात काँग्रेसने हे मोठं पापं केलं. गोंधळाचं वातावरण निर्माण करण्यात आलं, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.

कोरोना महामारित काँग्रेसने अनेक समस्या निर्माण केल्या

कोरोना महामारित काँग्रेसने अनेक समस्या निर्माण केल्या. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा कोरोना संकट मोठ्या प्रमाणात वाढलं. हे कशा पद्धतीचं राजकारण आहे. अशा प्रकारचं राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. मागील दोन वर्षांपासून देश कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे, असं मोदी म्हणाले.

कोरोना संकट वाढवण्याचं पाप हे काँग्रेसने केलं

दिल्लीतील सरकारनं गाड्यांवर माईक आणि स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगाराना आणि मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितलं. त्यांच्यासाठी बसची सोय करून दिली. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त नव्हता. मात्र, कोरोना संकट वाढवण्याचं पाप हे काँग्रेसने केलंय,अशा प्रकारचा गंभीर आरोप करत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

गोव्याने तुम्हाला स्वीकारलं नाही

नागालँडच्या नागिराकांनी १९९८ मध्ये काँग्रेससाठी मतदान केलं होतं. या गोष्टीला जवळपास २४ वर्ष उलटली. ओडिसाने १९९५ मध्ये तुमच्यासाठी मतदान केलं होतं. परंतु तुम्हाला तिथे एन्ट्री मिळू शकली नाही. गोव्यात १९९४ मध्ये पूर्ण बहुमतांनी तुम्ही जिंकून आला होतात. या गोष्टीला २८ वर्ष पूर्ण झाले असून गोव्याने तुम्हाला स्वीकारलं नाही.

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

देशात काल जी घटना घडली. त्याबाबात मला दोन शब्द बोलायचे आहेत. देशाने लतादींदींसारख्या महान व्यक्तीला गमावलं आहे. त्यांच्या आवाजाने संपूर्ण देशाला आकर्षित आणि प्रेरित केलंय. अशा लतादीदी आपल्यातून निघून गेल्या आहेत. त्यांना आज मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मोदी म्हणाले.


हेही वाचा : Lata Mangeshkar: भाजपनंतर कॉंग्रेसचीही शिवाजी पार्कात लता दीदींचे स्मारक बनवण्याची मागणी


 

First Published on: February 7, 2022 6:23 PM
Exit mobile version