चंद्राबाबू नायडूंनी सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला – मोदी

चंद्राबाबू नायडूंनी सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला – मोदी

चंद्राबाबू नायडूंवर बरसले पंतप्रधान मोदी

‘मिशन दक्षिण’ मोहिमेवर असलेले पंचप्रधान मोदी नुकतेच आंध्रप्रदेशमध्ये पोहचले आहेत. एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर मोदी पहिल्यांदाच आंध्रप्रदेश दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये भाषण करतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नायडू यांनी केलेल्या ‘सिनिअर-जुनिअर’च्या वक्तव्यावर पलटवार करत मोदी म्हणाले की, ‘नायडू राजकारण करण्यात सिनिअर आहेत. मात्र, त्याचप्रमाणे प्रत्येक निवडणूकीत हरण्यामध्येही ते सिनिअर आहेत.’ ‘माननीय नायडू नेहमी सिनिअर-ज्युनिअरविषयी वक्तव्यं करतात याचं मला आश्चर्य वाटतं’, असंही मोदी म्हणाले. चंद्राबाबू नायडू सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं म्हणत मोदींनी सिनिऑरिटीच्या मुद्द्यांवरुन चांगलाच समाचार घेतला.

भाषणादरम्यान मोदी म्हणाले…

मोदी यावेळी म्हणाले, ‘आंध्र प्रदेशाचा अपमान करणारा NTR पक्षाला दुष्ट असं संबोधलं जातं. मात्र, त्याच राज्याचे मुख्यमंत्री आज NTR चे मित्र आहेत.’

दरम्यान, दौऱ्यादरम्यान आज पंतप्रधान मोदी विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळावर उतरल्यानंतर राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, लक्षवेधी बाब म्हणजे पंतप्रधान मोदी विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळावर उतरल्यानंतर राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. राजनैतिक शिष्टाचाराला बगल देत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित नव्हता. या दौऱ्यादरम्यान मोदी गुंटूर येथाील सभेनंतर तिरूप्पूर आणि रायचूरला भेट देणार आहेत.

First Published on: February 10, 2019 2:48 PM
Exit mobile version