मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल; कॉंग्रेसमुळेच राम मंदिराला बिलंब

मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल; कॉंग्रेसमुळेच राम मंदिराला बिलंब

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

२०१४ च्या निवडणूकीत सत्ताधारी भाजप पक्ष राम मंदिराचे आश्वासन देऊन सत्तेत आली होती. परंतु, निवडणूक झाल्यानंतर चार वर्षे उलटून गेल्यावरही राम मंदिर उभारले गेले नाही. त्यामुळे शिवसेनेनेही मोदी सरकारला धारेवर धरले. यासाठी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे स्वत: दोन दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावर होते. राम मंदिर बांधावे यासाठी विश्व हिंदू परिषदेनेही आज महासभेचे आयोजन केले आहे. या महासभेसाठी लाखो रामभक्त अयोध्येत आले आहेत. आता या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांपासून राम मंदिर का उभारले गेले नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे. कॉंग्रेसमुळेच राम मंदिरला विलंब झाल्याचे मोदी म्हणाले आहेत. ते राजस्थान येथील अलवरमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

हेही वाचा – मंदिर नाही तर सरकार नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, राम मंदिर प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेत कॉंग्रेस अडथळे निर्माण करत आहे. कॉंग्रेस नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रकरणाची सुनावणी लांबवण्यास सांगितले आहे. अयोध्याचा खटला न्यायालयात सुरु असताना कॉंग्रेस नेते आणि राज्यसभा खासदारांनी सांगितले की, २०१९ मध्ये निवडणुका आहेत. तोपर्यंत खटला चालवू नका. देशाच्या न्यायव्यवस्थेला राजकारणात ओढणे योग्य आहे का?, असा सवाल मोदी यांनी केला.

हेही वाचा – अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

कॉंग्रेस न्यायमूर्तींना धमकावते – मोदी

मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सर्वोच्च न्यायालय जेव्हा राम मंदिर सारख्या संवेदनशील विषयावर मते जाणून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वकील न्यायमूर्तींविरोधात महाभियोग दाखल करुन त्यांना भीती दाखवत होते. यापुढे मोदी म्हणतात की, कॉंग्रेसने न्यायमुर्तींना धमकवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस जातीवाद पसरवत आहे. त्याना विकासाच्या मुद्यांवर बोलायचे नाही, असेही मोदी म्हणाले.


हेही वाचा – महासभेत दहशतवादी हल्ल्याची शक्यता – गुप्तचर यंत्रणा

First Published on: November 25, 2018 3:42 PM
Exit mobile version