संरक्षण करार म्हणजे काँग्रेससाठी एटीएम – नरेंद्र मोदी

संरक्षण करार म्हणजे काँग्रेससाठी एटीएम – नरेंद्र मोदी

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींची घोषणा

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांच्या प्रचारसभांना सुरुवातही झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. पूर्वीच्या सरकारसाठी संरक्षण करार म्हणजे एटीएम होते, असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला आहे. या मुलाखतीत त्यांनी पाच वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत काय काय कामे केली, याची उजळणी केली.

‘५५ वर्षे राज्य करुनही गरिबीवर बोलत आहेत’

नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान त्यांनी काँग्रेवरही सतत टीका केली. राहुल गांधी यांनी ‘गरिबी हटावो’चा नारा दिला आहे. हाच नारा १९७२ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीदेखील दिला होता. त्यामुळे या मुद्द्यावरुन मोदींनी काँग्रेसवर टीका केली. नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘एकाच कुटुंबातील चार पिढी गरिबीवर चर्चा करत आली आहे. याच लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत. त्यांनी आता तर गरिबांसाठी येजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते असं काहीतरी बोलत आहेत. मात्र, आता गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही.’

‘२५० कोटी चोरण्यापेक्षा २५० जोड कपडे असणं कधीही चांगलंच’

या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्याकडे २५० कपड्यांचे जोड असल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु, २५० कोटी चोरण्यापेक्षा २५० जोड कपडे असणं कधीही चांगलंच. जेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा अर्थव्यवस्था ठीक करण्यावर भर दिला. आधीच्या सरकारने आर्थिक घोटाळा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. फसवणारे पळून गेले. परंतु, आम्ही सत्तेवर आल्यावर कायदाच केला. आमच्या सरकारने १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली. मल्ल्या ९ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन पळून गेला. या फसवणाऱ्या आम्ही रस्त्यावर आणले आहे.

First Published on: March 29, 2019 12:29 PM
Exit mobile version