नरेंद्र मोदी प्रचंड आक्रमक, पाकिस्तनाच्या लष्करातील माजी अधिकाऱ्याला अणुबॉम्ब हल्ल्याची भीती

नरेंद्र मोदी प्रचंड आक्रमक, पाकिस्तनाच्या लष्करातील माजी अधिकाऱ्याला अणुबॉम्ब हल्ल्याची भीती

नवी दिल्ली – पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल आणि पाकिस्तानी नॅशनल कमांड ऑथॉरिटीचे सल्लागार खालिद अहमद किदवई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबती वादग्रस्त वक्तव्य केलंय. भारतातील न्यूक्लिअर शस्त्रास्त्राची ताकद हिंदू कट्टरपंथियांच्या हातात आहे, त्यामळे येथे सामाजिक अस्थिरता अधिक वाढली आहे, असं विधान खालिद किदवई यांनी केलयं.

सोमवारी दक्षिण आशियात सामाजिक अस्थिरतेवर एक शिबीर घेण्यात आले होते. त्यावेळी किदवई यांनी भारतातील परमाणू शक्ती आता कट्टरपंथीयांच्या हातात गेल्याचं वक्तव्य केलं. भारतात कट्टरपंथीय विचारधारेचे सरकार आणि अणूबॉम्ब शक्ती असणं अत्यंत धोकादायक कॉम्बिनेशन आहे, जे दक्षिण आशियाच्या स्थिरतेसाठी चिंतादायक आहे.

भारताच्या अणूबॉम्ब ताकदीच्या संदर्भात कमांड, कंट्रोल आणि ऑपरेशनलचा निर्णय इंडियन नॅशनल कमांड ऑथॉरिटी आहे. याची राजनितीक परिषदेची कमान पंतप्रधान नरेंद्र मोदी तर, कार्य परिषदेची जबाबदारी अजित डोवाल यांच्या हातात आहे. तसंच, मोदी सरकारमधील अनेक मंत्री आरएसएस पार्श्वभूमीतून आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच अणूबॉम्बच्या वापराबाबत नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. अणूबॉम्ब वापर करू असं मोदी खुलेपणाने बोलतात, त्यामुळे त्यांच्या शेजारच्या देशांना धोका पोहोचू शकतो, असंही किदवई म्हणाले.

First Published on: September 28, 2022 11:41 AM
Exit mobile version