सूर्याजवळ जाण्यास नासाचं यान सज्ज

सूर्याजवळ जाण्यास नासाचं यान सज्ज

प्रातिनिधिक फोटो

सूर्याच्या अगदी जवळ जाण्यासाठी नासानं पूर्ण तयारी केली आहे. एका कारच्या आकाराचं अंतराळ यान सूर्याजवळून ४० लाख मैलावरून जाणार आहे. यापूर्वी कोणतंही यान सूर्याच्या इतक्या जवळून आणि इतक्या प्रकाशातून गेलं नाही. पार्कर सोलर प्रोब असं यानाचं नाव असून ६ ऑगस्टला युनायटेड लाँच अलायन्स डेल्टा IV हेव्ही मधून उड्डाण करेल. हे अंतराळ यान आतापर्यंत मानवनिर्मित कोणत्याही वस्तूच्या तुलनेत सूर्याच्याजवळ जाणारं सर्वात पहिलं यान असून सूर्याचा अभ्यास करेल.

डोळ्यांनी दिसणाऱ्या सूर्यापेक्षा अधिक प्रखर 

यासंदर्भात ‘गेल्या कित्येक दशकांपासून सूर्याचा अभ्यास चालू असून आता शेवटी आपल्याला किती यश मिळालं आहे हे कळेल. तर, आपण ज्या सूर्याला डोळ्यांनी पाहतो त्यापेक्षाही सूर्य अधिक प्रखर आहे. आपल्याला डोळ्यांना सूर्य स्थायी आणि न बदलणाऱ्या आकारात एका गोळ्यासारखा दिसतो पण सूर्य एक अतिशय गतिशील आणि सक्रिय तारा आहे.’ असं अमेरिकेतील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरच्या हेलिओफिडिक्स सायन्स डिव्हिजनच्या सहयोगी संचालक अलेक्स यंगनं सांगितलं आहे. तर पार्कर सोलर प्रोब आपल्यासह विविध उपकरण घेऊन जात आहे, जे सूर्याच्या आतील आणि आसपासच्या प्रत्यक्ष रुपाचा अभ्यास करू शकेल. या उपकरणात साठलेल्या डेटामधून वैज्ञानिकांना सूर्याबद्दल असलेल्या काही प्रश्नांबद्दल उत्तर शोधण्यास मदत मिळेल असंही त्यानं स्पष्ट केलं असल्याचं इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सनं सांगितलं आहे.

पार्कर सोलर प्रोब

नासाकडून पाठवण्यात येणाऱ्या यानाचं नाव ‘पार्कर सोलर प्रोब’ आहे. यानाचं नाव अमेरिका सौर वैज्ञानिक युजीन न्यूमॅन पार्करच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. हे यान एका छोट्या कारच्या आकाराचं आहे. हे सूर्याच्या वातावरणात राहून सूर्याचे किरण आणि सूर्यापासून निघणाऱ्या तरंगांचा (कोरोना) शोध घेणार आहे. या शोध यानाची लांबी ९ फूट आणि १० इंच आहे, तर वजन ६१२ किलोग्रॅम आहे. ६ ऑगस्टपासून याची सफर सुरु होणार असून २०२४ मध्ये सूर्याच्या वातावरणात प्रवेश करेल. नासाच्या या अभियानाचा खर्च १.५ अब्ज डॉलर इतका असून आतापर्यंतचं नासाचं सर्वात मोठं मिशन आहे. पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या पृष्ठभागाच्या ६१ लाख किमी दूर वातावरणात चक्कर मारणार असून आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या यानाच्या तुलनेत सातपट कमी आहे. सूर्याजवळ पोहचून हे यान साधारण सात लाख किमी प्रतितास वेगानं सफर करेल.

First Published on: July 23, 2018 5:05 PM
Exit mobile version