मंगळावर दिसले ‘बर्फाचे थर’; NASA च्या नव्या फोटोंमधून आले समोर

मंगळावर दिसले ‘बर्फाचे थर’; NASA च्या नव्या फोटोंमधून आले समोर

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अंतराळयान मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटरने काढलेल्या फोटोंमध्ये एक आश्चर्यकारक खुलासा समोर आला आहे. नासाच्या या नव्या फोटोत मंगळावर ‘बर्फाचे थर’ असल्याचे दिसतेय. नासाने हे नवे फोटोस आपल्या वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहेत. मंगळ हा सूर्यापासून चौथा ग्रह, जगभरातील लोकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा स्रोत राहिला आहे. वर्षानुवर्षे विविध देशांतील वैज्ञानिक संशोधनांमुळे पृथ्वीवरील लोकांना लाल ग्रहाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत झाली आहे.

नासाने शेअर केलेले फोटो पाहून ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामध्ये गोठलेल्या बर्फाची आठवण होते. इतकेच नाही तर या कारणांमुळे मंगळावर मोठे तलाव तयार झाले आहेत. नासाने आपल्या साईटवर लिहिले आहे की, जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे. परंतु हे केवळ पृथ्वीवर शक्य आहे. म्हणूनच आपले शास्त्रज्ञ मंगळाच्या कोरड्या जमीनीलक द्रव पदार्थाचा शोध घेत आहेत.

या पोस्टला १० लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत आणि ही संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. या फोटोवर युजर्स आपल्या प्रतिक्रिया देखील देताना दिसताय. एका इन्स्टाग्राम युजर्सने असे लिहिले की, हे भव्य आहे. तर दुसऱ्या युजर्सने असे लिहिले की, हे एक महाकाव्य आहे.

नासाने असे म्हटले की, थोडी उष्णता असल्यास, बर्फ वितळतो आणि पाणी तयार होते, पण हे फार काळ टिकत नाही. पाणी काही सेकंदात वाफेमध्ये बदलते. २०१८ मध्ये इटलीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सचे शास्त्रज्ञ रॉबर्टो ओरोसी यांनी मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाच्या खाली बर्फाळ तलाव शोधले होते. त्याने युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या मार्स एक्सप्रेस ऑर्बिटर कडून याचे पुरावे गोळा केले. जेफ्री म्हणाले की, मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाखाली पाणी किंवा बर्फाच्छादित तलाव नसतील असे आम्ही म्हणत नाही. पण क्ले थिअरी नाकारता येत नाही. 2015 मध्ये, मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटरने मंगळाच्या उंच पर्वतावरून ओली असलेली वाळू सरकताना आणि त्याचा आकार बदलताना पाहिले होते.


Maharashtra Unlock: मुंबईला दिलासा, पुण्याला निराशा ‘ही’ आहेत कारणं

First Published on: August 3, 2021 2:05 PM
Exit mobile version