विराट हा जगातील सर्वात उद्धट खेळाडू – नसिरुद्दीन शाह

विराट हा जगातील सर्वात उद्धट खेळाडू – नसिरुद्दीन शाह

Naseeruddin Shah Medical Condition : 'या' आजाराने ग्रस्त आहेत अभिनेते नसिरुद्दीन शाह

काही दिवसांपूर्वी एका भारतीय चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. यामध्ये त्या चाहत्याने म्हटले होते की, आपल्याला भारतीय खेळाडूंपेक्षा ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडच्या खेळाडूंना खेळताना पाहण्यात आनंद मिळत होतो, याउलट भारतीय खेळाडूंना खेळताना बघण्यात अजिबात आनंद होत नाही, असे चाहत्याने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले होते. यावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच रागावला. त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओमार्फत या चाहत्याला प्रत्युत्तर दिले. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते की, ज्या भारतीयांना देशाचे खेळाडू आवडत नाहीत, त्यांनी देश सोडून निघून जावे. यावर आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत शाह विराटला तो चांगला खेळाडू जरी असता तरी उद्धट असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – चाहत्याला देश सोडून जा सांगितल्यामुळे विराट झाला ट्रोल

नेमकं काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?

नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, विराट कोहली हा फक्त जगातील सर्वात उत्तम खेळाडू नाही तर सर्वाट वाईट वर्तवणूक असणारा खेळाडू आहे. त्याने क्रिकेटमध्ये कमवलेले नामलौकीक त्याच्या अहंकार आणि वाईट वर्तवणूकीसमोर फिके पाडणारे आहे. त्याचबरोबर आपला देश सोडण्याचा कुठलाही हेतू नसल्याचे शाह म्हणाले. दरम्यान, शाह यांच्या या पोस्टवर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. याप्रकरणी काही लोक नसिरुद्दीन शाह यांना ट्रोल करीत आहे तर काही विराट कोहलीला ट्रोल करीत आहेत.


हेही वाचा – भारतीय चाहत्यांमुळं तुला पगार मिळतो, BCCIनं विराटला सुनावलं

First Published on: December 17, 2018 10:10 PM
Exit mobile version