…तर माणसाला भविष्यात कोरोनाहून जीवघेण्या महामारीसाठी सज्ज राहावे लागेल

…तर माणसाला भविष्यात कोरोनाहून जीवघेण्या महामारीसाठी सज्ज राहावे लागेल

कोरोना

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पर्यावरण तज्ज्ञ हा निर्सगाचा संदेश असल्याचं म्हणत आहेत. जो मानवाला त्यांच्या कृत्यांबद्दल इशारा देत आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण प्रमुख इनगर अँडरसन मानतात की, मानव निसर्गावर  दबाव टाकत असल्यामुळे त्याचा परिणाम विध्वंसक रुपात होत आहे. जर आपण सर्वजण या ग्रहाची काळजी घेण्यात यश मिळवलं नाहीतर आपण स्वतःचे संरक्षण करू शकणार नाही.

जगातील प्रमुख वैज्ञानिकांनी पृथ्वीचा आणि संसाधने यांचा नाश अग्नीशी खेळत असल्याचे वर्णन केलं आहे. पृथ्वीवरील लोकांसाठी कोरोना व्हायरसच्या रुपात इशार देत असल्याचं म्हटलं आहे. वन्यजीवांमध्ये वेगाने वाढणारा
हस्तक्षेप मर्यादित नसेल तर माणसाला भविष्यात कोरोनाहून प्राणघातक महामारीसाठी सज्ज राहावे लागेल.

जगभरातील जिवंत प्राण्याच्या बाजारावर बंदी घालणे गरजेचे आहे. यामुळे रोगांचा प्रसार होत असतो. निसर्गशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, निसर्ग आपल्याला वारंवार इशारा देत आहे. परंतु आपल्याला ते कळतं नाही आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करूनही आपले डोळे उघडत नाही आहेत. जंगलात लागणारी आग, सतत वाढणारी उष्णता अशाप्रकारे निर्सग आपल्याला इशार देत आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी एकच उपाय आहे. पहिला पृथ्वीवरील उष्णतेचे प्रमाण कमी करावे लागले. दुसरा म्हणजे शेती, खाणकाम आणि गृहनिर्माण यासारख्या मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी जंगलांवरील अतिक्रमणावर बंदी घालण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टीमुळे वन्यजीवांना मनुष्याच्या संपर्कात येण्यास भाग पाडतात.

निरोगी पर्यावरणशास्त्र आपल्याला या रोगांशी लढण्यास मदत करते. जैवविविधतेमुळे रोगाचे वेगाने होणारे प्रसार कमी होईल.  एका अंदाजानुसार, दहा लाख जीव आणि वनस्पती प्रजाती टिकून राहण्यासाठी धोका आहे. दर चार महिन्यांना एक नवीन रोगाचे संसर्ग होईल. या नवीन रोगांचे संक्रमण प्राण्यांपासून होईल. जर आपण शाश्वत मॉडेल्सचा वापर करून हवामान बदल आणि जैवविविधतेचे नुकसान रोखण्याचा प्रयत्न केला तर ते निसर्गासाठी फायद्याचे ठरणार नाही तर ते फक्त मानवी आरोग्याचे संरक्षण करेल.


हेही वाचा – LockDown: क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे पोलिसांवर केला हल्ला!


 

First Published on: April 20, 2020 9:35 AM
Exit mobile version