काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं वादग्रस्त वक्तव्य; पंतप्रधानांना म्हटलं…

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं वादग्रस्त वक्तव्य; पंतप्रधानांना म्हटलं…

नोटाबंदीवर वक्तव्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अशोभनीय भाषा वापरली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधानांना पागल मोदी म्हटलं आहे.

राजकीय नेत्यांचे शब्द दिवसेंदिवस खालची पातळी गाठत आहेत. यामध्ये लोकसभेचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रावीण्य मिळवले असून, त्यात त्यांनी आता आणखी एका भर घातली आहे. नोटाबंदीवर वक्तव्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अशोभनीय भाषा वापरली आहे. त्यांनी पंतप्रधानांना पागल मोदी म्हटलं आहे. अधिर रंजन चौधरी म्हणाले की, नोटाबंदीनंतर ते पागल झाले आहेत. हे मोदी नाहीत… तर पागल मोदी आहेत. त्यांच्या या अशा वागण्यामुळेच विरोधक हे मोदींच्या विरोधात एकवटत आहेत. ( National Congress leader Adhir Ranjan Chaudhary called PM Modi as Pagal Modi  )

अधीर रंजन म्हणाले की, आज भारतात काय चालले आहे. हे सर्वांना माहीत आहे. जो कोणी मोदी सरकारविरोधात आवाज उठवतो, त्याला ते मार्गातून दूर करतात. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आवाज उठवताच त्यांची खासदारकी हिसकावून घेतली, असं चौधरी म्हणाले,

अधीर रंजन यांनी पंतप्रधानांविरोधात अशी भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे शब्द त्यांनी अनेकदा वापरले आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांना गंगा कुठे आहे आणि गलिच्छ नाला कुठे आहे, असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर त्यांना राक्षसही म्हटले होते. आपल्या पक्षाच्या एका नेत्याने मोदींची प्रशंसा केल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे विधान केले आहे. याआधीही त्यांनी मोदी हे देशाचे बाप नसल्याचे म्हटले होते. तसचं, याआधीही त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात केवळ अधीरच नाही तर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे नेते असे अपशब्द वापरत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानांना विषारी साप म्हटलं होतं.

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधानांना दंगलखोर, दुर्योधन, दु:शासन आणि दरोडेखोर म्हटले आहे. तसचं त्यांनी मोदींना खुनी देखील म्हटले आहे.

लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी प्रताप यादव यांनीही पंतप्रधानांना सोडले नाही. आपण त्याची त्वचा सोलून काढू, असे ते म्हणाले होते. लालू यादव यांची सुरक्षा कमी केल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे वक्तव्य केले होते. तेजस्वी यादव म्हणाले की, माझे वडील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. त्यांचे अनेक शत्रूही आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा हिसकावून घेणे म्हणजे त्यांच्या हत्येचा कट आहे. आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ.

( हेही वाचा: नवीन संसदेत स्थापन होणार भारताचा ‘राजदंड’; जाणून घ्या ‘सेंगोल’ची कहाणी )

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही मोदींवर हल्ला करण्यात मागे राहिल्या नाहीत. मोदींनी आपले मार्ग सुधारावे नाहीतर हात आणि गळा कापण्याइतके लोक बिहारमध्ये आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या.

First Published on: May 24, 2023 3:17 PM
Exit mobile version