Corona: देशात २४ तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा १ लाख ३१ हजारांवर!

Corona: देशात २४ तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा १ लाख ३१ हजारांवर!

भारतात गेल्या २४ तासांत ६ हजार ७६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ लाख ३१ हजार ८६८ वर पोहचला आहे. दरम्यान २ हजार ६५७ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात सध्या ७३ हजार ५६० अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले असून त्यांची संख्या ४७ हजार १९० अशी आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू १५ हजार ५१२, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात १३ हजार ६६४, चौथ्या क्रमांकावर दिल्ली १२ हजार ९१० आणि राजस्थान ६ हजार ७४२ रूग्णांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये १हजार ५६६ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ६३४ झाली असून देशात सर्वाधिक कोरोनाबाधित हे मुंबई शहरात असल्याचे सांगण्यात येत आहे.


शनिवारी बेस्टच्या १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; १९० कर्मचारी करोनाग्रस्त!

 

First Published on: May 24, 2020 11:10 AM
Exit mobile version