देशातील अनोखे रेल्वे स्टेशन, स्टेशन मास्तरांची केबिन गुजरातमध्ये तर तिकीट मिळते महाराष्ट्रात

देशातील अनोखे रेल्वे स्टेशन, स्टेशन मास्तरांची केबिन गुजरातमध्ये तर तिकीट मिळते महाराष्ट्रात

भारतीय रेल्वेशी ( Indian Railway) संबंधित अनेक मजेदार किस्से  funny stories) आहेत, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. एका रेल्वे स्थानकाशी संबंधित असाच एक रंजक किस्सा आहे. हे रेल्वे स्टेशन अर्धे महाराष्ट्रात (Maharashtra) आणि अर्धे गुजरातमध्ये (Gujarat) आहे. म्हणजेच या स्थानकावर दोन्ही राज्यांचा हक्क आहे.

या अनोख्या स्टेशनचे नाव नवापूर स्टेशन (Navapur station) आहे. हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. विशेष म्हणजे या स्टेशनवरील एका बाकावर अर्ध्या भागात महाराष्ट्र आणि अर्ध्या भागात गुजरात असे लिहिले आहे. या बाकावर महाराष्ट्र आणि गुजरात का लिहिले आहे हे या स्टेशनबद्दल माहिती नसलेल्या प्रवाशांना चांगला धक्का बसतो.

नवापूर स्टेशनची खास वैशिष्ट्ये
स्टेशनची खास गोष्ट म्हणजे तिची तिकीट खिडकी महाराष्ट्रात येते तर स्टेशन मास्तर गुजरातमध्ये बसतात. एवढेच नाही तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशनवर मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्ये घोषणा दिल्या जातात. एवढेच नाही तर स्टेशनची तिकीट खिडकी आणि स्टेशन मास्तर कार्यालय याशिवाय नवापूर येथे रेल्वे पोलिस स्टेशन आणि खाण्यापिण्याची दुकाने महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहेत. तर वेटिंग रूम, पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृह गुजरातच्या तापी जिल्ह्यातील उच्छलमध्ये आहे. स्टेशनची एकूण लांबी 800 मीटर आहे. त्यापैकी 300 मीटर महाराष्ट्रात आणि 500 ​​मीटर गुजरातमध्ये आहे. विशेष म्हणजे स्टेशनवर येणारी ट्रेन अर्धी गुजरात आणि अर्धी महाराष्ट्रात असते.

आणखी एक स्टेशन दोन राज्यात
आता तुम्ही विचार करत असाल की हे स्टेशन असे का बांधले गेले. खरे तर हे स्टेशन बांधले तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्राचे विभाजन झाले नव्हते. तेव्हा हे स्टेशन संयुक्त मुंबई प्रांतात येत असे. परंतु १ मे १९६१ रोजी मुंबई प्रांताचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली. फाळणीच्या वेळी हे स्टेशन दोन्ही राज्यांच्या सीमेवर आले. देशात फक्त हे एकच स्टेशन नाही जे दोन्ही राज्यांमध्ये येते.  याशिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर भवानी मंडी हे आणखी एक स्टेशन आहे. मंडी स्टेशनचा काही भाग राजस्थानमध्ये तर काही भाग मध्य प्रदेशमध्ये आहे.

 

 

First Published on: May 30, 2022 6:18 PM
Exit mobile version