Punjab Election 2022 : नवज्योत सिंग सिद्धूंची क्रेझ परदेशातही, मतदानासाठी अमेरिकेतून गाठले पंजाब

Punjab Election 2022 : नवज्योत सिंग सिद्धूंची क्रेझ परदेशातही, मतदानासाठी अमेरिकेतून गाठले पंजाब

पंजाबमध्ये आज (रविवार) विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडत आहे. परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची क्रेझ अगदी परदेशापर्यंत आहे. कारण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एका मतदाराने चक्क अमेरिकेहून भारताचा प्रवास केला आहे. फक्त मतदानासाठी ही व्यक्ती भारतात दाखल झाली आहे. ८० वर्षीय निरंजन सिंग यांनी रविवारी अमृतसर पूर्व येथील लॉर्ड कृष्णा शाळेत पोहोचून मतदान केलं आहे. माझा जन्म याच ठिकाणी झाला. त्यामुळे मी भारताला सोडू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देखील निरंजन सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

निरंजन सिंग यापूर्वी पवन नगरमध्ये स्थायिक होते. २३ वर्षांपूर्वी त्यांच्या भावाने त्यांना अमेरिकेत बोलावले. येथे ते पेट्रोल पंपावर काम करीत होते आणि अमेरिकेत जाऊन सुद्धा त्यांनी पेट्रोल भरण्याचे काम सुरू केले. परंतु आपल्या भारताला ते कधीही विसरले नाहीत. निरंजन दर पाच वर्षांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतात येतात. त्यांचे संपूर्ण कुटुंबिय अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

२०१७ च्या निवडणुकीवेळी लावली होती उपस्थिती

२३ वर्ष अमेरिकेत राहूनही त्यांना भारतातील नागरिकत्व कधीच सोडलं नाही. आजही ते भारताचे नागरिक असून न्यू पवन नगरमध्ये त्यांचे मत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ते भारतात नक्की येतात. २०१७ मध्ये जेव्हा नवज्योत सिंग सिद्धू विधानसभा अमृतसरमधून उभ राहणार असल्याचं त्यांना समजलं. तेव्हा ते मतदान करण्यासाठी भारतात आले. फक्त सिद्धू यांच्यासाठी पुन्हा ते मतदान करण्यासाठी आले आहेत, असं निरंजन सिंग यांनी सांगितलं.

First Published on: February 20, 2022 7:14 PM
Exit mobile version