दिल्ली विधानसभा: ‘देशद्रोही भाजपला जनतेनं नाकारलं!’

दिल्ली विधानसभा: ‘देशद्रोही भाजपला जनतेनं नाकारलं!’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालावर ट्वीट करत प्रतिक्रीया दिली आहे. आपली प्रतिक्रीया देताना त्यांनी भाजपवर मात्र जोरदार टीका केली आहे. दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारलं असल्याचं मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका असं आवाहन केलं होतं. दिल्लीच्या जनतेने त्यांचं ऐकलं असून भाजपला देशद्रोही घोषित करून टाकलं आहे. असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.दिल्ली निवडणुकीत भाजपने हजारो कोटी रूपये वाटल्याचा आरोपही मलिक यांनी ट्विटमधून केला आहे. धन, बल आणि छल हार गया, विकास और विश्वास जीता. असे नबाव मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. सध्या आप ४८ तर भाजपा २२ जागांवर आघाडीवर आहे. मागच्यावेळेस २०१५ साली जेव्हा दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली होती. तेव्हा देखील आपने ७० पैकी ६७ जागा जिकंत मजबूत सरकार बनवले होते. भाजपला केवळ ३ जागा तर सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या.

First Published on: February 11, 2020 11:22 AM
Exit mobile version