बसपा सत्तेत आल्यावर नक्षलवाद थांबेल – मायावती

बसपा सत्तेत आल्यावर नक्षलवाद थांबेल – मायावती

मायावती 

राज्यातील अल्पसंख्याक, मुस्लिम आणि गरीब नागरिकांची नक्षलवादींपासून रक्षा करणार असल्याचे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्री मायावती यांनी दिले आहे. आम्ही सत्तेवर आल्यास नक्षलवाद्यांचे हल्ले कमी होतील अशी खात्री त्यांना लोकांना दिली आहे. आम्ही सत्तेवर आल्यास नक्षलवादी हा परिससर सोडून विकास कामामध्ये सरकारची मदत करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. छत्तीसगड येथील अकलतरा येथे आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीमध्ये त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या मायावती?

“आता पर्यंत छत्तीसगड राज्यात अनेक राजकीय पक्षांनी राज्य केले. मात्र येथील गरीब, दलित आणि मागासवर्गीय नागरिकांचा विकास झाला नाही. माझ्या पक्षाला गरीब, दलित आणि मागसवर्गीयांचीच साथ आहे. आमच्या पक्षावर विश्वास ठेऊन त्यांचे राहणीमान सुधारणार आहे. याच बरोबर नक्षलवादीही आपली हत्यारे टाकून योग्य मार्गाने काम करतील. छत्तीसगड येथे आमच्या पक्षाला जिंकवून लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आहेत. ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी या भागाचा विकास झाला नाही आता भाजप सत्तेत आल्यानंतर त्याला विकास करण्याची ईच्छा नसल्याचे दिसते आहे. या दोन्ही पक्षांना आरक्षण संपवायचे आहे.”- बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्री मायावती

First Published on: November 4, 2018 7:13 PM
Exit mobile version