शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसऱ्यांदा खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसऱ्यांदा खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसऱ्यांदा खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या दिल्लीत खलबतं सुरु आहेत. मुंबईत झालेल्या भेटीनंतर दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा या दोघांमध्ये चर्चा होत असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार हे काल दिल्लीला पोहोचले आहेत. तीन दिवस ते दिल्लीला असणार आहेत.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ६ जनपथ निवासस्थानी बैठक सुरू आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक होत आहे. दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादी कांग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवार २२ जून आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, पीसी चाको उपस्थित राहणार आहेत.

प्रशांत किशोर यांनी ११ जूनला शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती. देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या विरोधात सशक्त पर्याय असावा असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. प्रत्यक्ष राजकारणात प्रशांत किशोर नसले तरी मोदींविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचं काम किशोर करत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबत दुसऱ्यांदा बैठक होत असल्यामुळे चर्चांना वेग आला आहे.

 

First Published on: June 21, 2021 12:41 PM
Exit mobile version