NEET आणि JEE Main परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या

NEET आणि JEE Main परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या

इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा NEET आणि मेडिकलची प्रवेश परीक्षा JEE Main संपूर्ण देशात जुलै महिन्यात घेण्यात येणार होत्या. मात्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला आहे. जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्याने त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला आहे.

ऐन परीक्षांच्या काळात करोनाने देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. करोनामुळे यंदा JEE व NEET या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आले होते. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्याने दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

First Published on: July 3, 2020 9:24 PM
Exit mobile version