#stepdownmodi : नेटकऱ्यांकडून मोदींवर सडकून टीका

#stepdownmodi : नेटकऱ्यांकडून मोदींवर सडकून टीका

नरेंद्र मोदी

जगभरात कोरोनाचे सावट पसरले असून देशातील केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाच्या लढ्यासाठी अनेक निर्णय घेत आहे. परंतु मोदींनी घेतलेले निर्णय हे जनतेला काही पटलेले नाही, त्यामुळे ट्विटरवर #stepdownmodi हा नवा ट्रेंड सुरू आहे. मोदींवर टीका करणारे आणि एकंदरीत वर्षभराच्या राजकारणावर बोट दाखवणारे ट्विट नेटकरी करत आहेत. आतापर्यंत १२ हजाराहून अधिक ट्विट हे #stepdownmodi हा ट्रेंड वापरून करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्षभरातील कामगिरी पाहता जनता निराश असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या महामारीत तुमचे निर्णय कसे चुकले आहेत. याशिवाय लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे बरेच हाल झाले. तसेच जी काही आकडेवारी सांगितली जाते, त्यात काही सत्यता दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना त्याच्या घरी किंवा गावी सोडण्यासाठी ज्या श्रमिक रेल्वे सोडल्या गेल्या, त्याचे भरमसाट तिकिटाचे पैसे गरीब जनतेकडून वसूल करण्यात आले.

पीएम केअर फंडचा हिशोब दिला जात नाही. तसेच माहितीच्या अधिकाऱ्याखाली कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही. निर्मला सीतारामन यांनी ज्या पॅकेजचे वितरण केले. ते सर्व सामान्यांच्या समजण्या पलीकडे होते. १ कोटी कोरोना रुग्णांचे मोफत उपचार करण्यात आले, असे ‘मन की बात’मध्ये सांगितले. अशाप्रकारच्या ट्विटर टीका नेटकरी करत असून #stepdownmodi हा ट्रेंड वापरून मोदींना निशाणा केला जात आहे.

First Published on: June 1, 2020 2:30 PM
Exit mobile version