शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा वातानुकूलित कक्षातील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा वातानुकूलित कक्षातील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा वातानुकूलित कक्षातील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील ७ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत आणि पावसाची झोड सोसत मोठ्या संख्येने शेतकरी सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांचा त्यांच्या वातानुकूलीत केबीनमध्ये विश्रांती घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राकेश टिकैत यांचा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांच्या प्रितिक्रिया आल्या आहेत. शेतकऱ्याला एसीमध्ये झोपण्याचा आणि महागडे कपडे घालण्याचा अधिकार नाही तर एका नेत्याला तो अधिकार आहे असं एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्त निवेदिका यांनी राकेश टिकैत यांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, दिवसभर उन्हात मेहनत करुन एक मेहनती शेतकरी वातानुकूलित खोलीत आराम करण्यास पात्र असूच शकतो. परंतु कार्पेट गादी काही मोठी गोष्ट नाही आहे. यामुळे अनावश्यक बोलणं टाळावे. या निवेदिकेच्या ट्विटवर आणखी एका पत्रकाराने ट्विट केलं आहे की, बरोबर आहे.. एक शेतकरी वातानुकूलित (एसी रुम) खोलीत कसा झोपू शकतो, शेतकऱ्यांचे काम तर फक्त आत्महत्या करणं, भुकेलेला आणि गरीब राहणं आहे. एसीमध्ये बसणे, करोड रुपयांच्या गाडीत फिरणे, लाखो रुपयांचे कपडे परिधान करणं हे तर नेत्यांचे काम आहे. त्यांना कोण प्रश्न विचारु शकतं परंतु कोणता प्रश्न असेल तर शेतकऱ्यांनाच विचारला जाईल हे समझू शकतो.

दरम्यान आणखी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने कमेंट केली आहे की, “जाहीर सभेत, मोर्चांमध्ये बांधण्यात येणाऱ्या मंचावर (स्टेज) ४ ते ८ वातानुकूलित यंत्र( AC Machine) कोणाला दिसत नाहीत. परंतु मागील ७ महिन्यांपासून घरापासून दूर आंदोलनातील एका शेतकऱ्याच्या कक्षेत, तंबूत असलेलं वातानुकूलित यंत्र दिसलं…वाह”

माजी आयएएस प्रताप सिंह यांचा पाठिंबा

राकेश टिकैत यांच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी माजी आयएएस सुर्य प्रताप सिंह यांनी ट्विट केलं आहे. अशी कशी वाईट विचारसरणी? एसीमध्ये बसलेला माणूस शेतकरी असू शकत नाही का? हे शेतकरी आहेत ज्यांच्यामुळे भारताला सोन्याची चिमणी म्हणून संबोधले जाते. देशात जर सर्व सुविधांचा हक्क कोणाला असेल तर ते फक्त जवान आणि शेतकऱ्यांनाचा आहे. असे ट्विट करत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

शेतकरी आंदोलनाला ७ महिने पुर्ण

केंद्र सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. दिल्लीच्या सीमेवर मागील ७ महिन्यांपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी तंबू ठोकून आंदोलन सुरु केलं आहे. आतापर्यंत केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्या आहेत परंतु या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकार या कायद्यांना मागे न घेण्यावर ठाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. आतापर्यंत शेकडोंपेक्षा जास्त शेतकरी आंदोलकांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे.

First Published on: June 28, 2021 3:06 PM
Exit mobile version