चीनमध्ये पसरली Covid-19 नवी लाट; युनिव्हर्सिटी कॅम्पस सील करून १५०० विद्यार्थ्यांना केलं आयसोलेट

चीनमध्ये पसरली Covid-19 नवी लाट; युनिव्हर्सिटी कॅम्पस सील करून १५०० विद्यार्थ्यांना केलं आयसोलेट

चीनमध्ये पसरली Covid-19 नवी लाट; युनिव्हर्सिटी कॅम्पस सील करून १५०० विद्यार्थ्यांना केलं आयसोलेट

ज्या चीनपासून कोरोना महामारीचे थैमान सुरू झाले, त्या चीनमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. चीनमधील बऱ्याच प्रांतामध्ये कोरोना महामारीचे थैमान सुरू आहे, त्यामुळे काही प्रांतांमध्ये लॉकडाऊन केले आहे. दरम्यान आता चीनमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जवळपास १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेल्समध्ये आयसोलेटेड केले आहे.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चीनच्या दालियान प्रांताच्या नॉर्थ-वेस्टर्न सिटीमधील झुंगाझे युनिव्हर्सिटीमध्ये रविवारी कोरोना डझनभर प्रकरणे आढळली. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्पसला सील करण्यात आले. शिवाय विद्यार्थ्यांना देखरेखीखाली ठेवण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवले. त्यामुळे विद्यार्थी हॉटेलमधून ऑनलाईन क्लास अटेंड करत आहेत आणि त्यांना खोलीत जेवण दिलं जात आहे.

दरम्यान चीन सातत्याने जीरो टॉलरेंस नीती अवलंबताना दिसत आहे. कोरोनाची काही प्रकरणे आढळली तरी चीन त्वरित तिथे लॉकडाऊन लागू करत आहे. क्वारंटाईन, टेस्टिंग आणि ट्रॅव्हलवर निर्बंध हे चीनमधील नागरिकांना न्यू नॉर्मलसारखे झाले आहे. सध्या चीनमध्ये कोरोना विरोधात लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना लसीचे डोस चीनमध्ये दिल्याचा दावा केला जात आहे. शिवाय आता चीनमध्ये बुस्टर डोस देण्याची तयारी सुरू आहे.

चीन कोरोनाला रोखण्यासाठी बरेच निर्बंध लावत आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी आता देशातून कोणत्याही भागातून येथे येण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट गरजेचा केला आहे. हा रिपोर्ट ४८ तासांपूर्वीचा असायला पाहिजे. गेल्या वर्षापासून चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी होताना दिसत आहेत. मात्र आता पुन्हा चीनमध्ये कोरोना वाढत आहे. चीनमध्ये आतापर्यंत ९८ हजार ३१५ एकूण कोरोनाबाधित आहे. यापैकी आतापर्यंत ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ मिशनच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३२ नवे कोरोनाबाधित समोर आले असून यामधील २५ केसेस एकट्या दालियान प्रांतातील आहेत.

First Published on: November 15, 2021 8:14 PM
Exit mobile version