भारत -तिबेट सीमेवरील ४५ जवानांना कोरोनाची लागण!

भारत -तिबेट सीमेवरील ४५ जवानांना कोरोनाची लागण!

Coronavirus: लष्कारातील जवानाला करोनाची लागण; लष्करातील पहिलीच घटना

दिल्लीत भारत- तिबेट सीमेवरील (Indo-Tibetan Border Police) ४५ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटीबीपी अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातील ४३ जवान राजधानी दिल्ली येथे सुरक्षेसाठी तैनात होते. तर २ जवान दिल्ली पोलिसांबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या कर्तव्यासाठी तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार दोन जवानांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर ४१ जवानांना दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे दाखल करण्यात आले आहे. भारत- तिबेट सीमेवर ७६ जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कारण हे जवान त्या ४५ जवानांच्या संपर्कात आले होते.

त्याचबरोबर सैन्य दलातली २४ जवान कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या जवानांना भारतीय सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सैन्याचे प्रवक्ता कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह असणारे हे २४ जवान भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. तर काही निवृत्त जवान आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाला आहे. या सर्व जवानांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर सशस्त्र सीमा बाल (एसएसबी) च्या १३ जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एसएसबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  संक्रमित जवानांपैकी ९जण दिल्लीतील घिटोरनी भागात असलेल्या २५ व्या बटालियनशी संबंधित आहेत,  तर इतर ४ संक्रमित वेगवेगळ्या बटालियनमध्ये तैनात आहेत.


हे ही वाचा – शिक्षकांच्या मागणीनंतरही दहावी, बारावीचे पेपर तपासण्याकडे दुर्लक्ष!


 

First Published on: May 5, 2020 9:29 PM
Exit mobile version