WhatsApp चं जबरदस्त फिचर, २४ तास आणि ७ दिवसांसाठी मॅसेज करता येणार डिलीट

WhatsApp चं जबरदस्त फिचर, २४ तास आणि ७ दिवसांसाठी मॅसेज करता येणार डिलीट

व्हॉट्सअॅपने एक जबरदस्त फिचर आणलं आहे. यामध्ये आपण २४ तास , ७ दिवस आणि ९० दिवसानंतरही सर्व नवीन चॅट्स डीफॉल्टनुसार डिलीट करू शकतो. अनेक प्रकारचे चॅट्स आपल्या मोबाईलमध्ये असतात. परंतु जे चॅट्स आपल्याला आवश्यक वाटत नाहीत. त्यांना डिलीट करणं हा योग्य पर्याय आहे. तसेच आता हा पर्याय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात आला आहे. WhatsApp युझर्स आपले पाठवलेले संदेश किंवा आलेले मॅसेज सहजपणे डिलीट करू शकतात किंवा अदृश्य करू शकतात. जगातील सर्वात मोठी इन्स्टंट मेसेजिंग सेवा एक सुरक्षा म्हणून ही ऑफर देऊ करत आहे.

फेसबुकचा वापर जागतिक स्तरावर २ अब्जपेक्षा जास्त युझर्स करत आहेत. आज व्हॉट्सअॅपने हा नवीन पर्याय आणला असून यामध्ये वापरकर्त्यांना सर्व नवीन चॅट डीफॉल्टनुसार डिलीट करता येणार आहेत. तसेच हा पर्याय २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसांचा कालावधी आहे.

जर चॅट्समधील काही सदस्यांनी तात्पुरता हा पर्यायाचा वापर केला तर ते चॅट्स काही वेळेनंतर डिलीट होतील. हे नवीन फिचर तुम्हाला विशेषत: ग्रूपमध्ये असणाऱ्या व्यक्तींना वापरता येणार आहे. ग्रूप क्रिएट करण्याआधीच हा पर्याय तुम्हाला येतो.त्यानुसार तुम्ही व्हॉट्सअपच्या नवीन फिचरचा वापर करू शकता. व्हॉट्सअपची सुरक्षा रहावी यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लाँच केले असून मॅसेजमध्ये काही प्रमाणात डीफाल्टचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

दरम्यान, फेसबुक पोस्टमध्ये सर्व प्रकारचे चॅट्स ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे डिफॉल्टनुसार डिलीट हा पर्याय देण्यात आल्याचं मार्क झुकेरबर्गने म्हटलं आहे.

First Published on: December 6, 2021 10:53 PM
Exit mobile version