एका आठवड्याच्या आत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन!

एका आठवड्याच्या आत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन!

एकाबाजूला जगभरात कोरोना व्हायसरचा फैलाव वाढत आहे. पण दुसऱ्या बाजूला ब्रिटनमध्ये नवीन कोरोना व्हायरसचा पहिला स्ट्रेन आढळला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत हा स्ट्रेन आढळून आला. मात्र आता एका आठवड्यातच ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या स्ट्रेनपेक्षा हा दुसरा स्ट्रेन धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बुधवारी संध्याकाळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दक्षिण आफ्रिकेतून जे दोन प्रवासी लंडनमध्ये परतले होते. त्यांची नियमाप्रमाणे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची नवीन स्ट्रेन आढळली.’

हा कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन आधीच्या कोरोना व्हायरस आणि पहिल्या कोरोना स्ट्रेनपेक्षा सुपरस्प्रेडर असल्याचे समोर आले आहे. या दुसऱ्या कोरोना स्ट्रेनचा प्रादुर्भाव लवकर पसरतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या दोन लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण आता यापूर्वी कुणी नवीन कोरोना व्हायरसचा रुग्ण आले आहेत का? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवरून इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर तूतार्स बंदी घातली आहे. तसेच जे दक्षिण आफ्रिकेचे लोकं डायरेक्ट विमानाने न येता कनेक्टेड विमानाने येत आहेत, त्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्याचे काम मोठ्या पातळीवर सुरू आहे. त्यांना आयोसोलेशन करणे सक्ती केले आहे आहे. माहितीनुसार, जवळपास आतापर्यंत १ मिलियन लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तसे फायझर कंपनीने नवीन स्ट्रेनवर त्यांची लस प्रभावी ठरू शकते असा दावा केला आहे. पण आता आढळलेल्या दुसऱ्या स्ट्रेनवर ब्रिटनमधील लस प्रभाव ठरले का, याबाबत अद्याप काही समोर आलेले नाही.


हेही वाचा – ब्रिटनमधील नवा कोरोना व्हायरस नियंत्रणाबाहेर, विमानांवर बंदी


 

First Published on: December 24, 2020 7:52 AM
Exit mobile version