राजस्थानमधील ‘योगा’ची गिनीज बुकात नोंद

राजस्थानमधील ‘योगा’ची गिनीज बुकात नोंद

राजस्थान कोटामध्ये योग करताना रामदेव बाबा

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज आकाश, पाणी, बर्फ अशा वेगवेगळ्या ठिकाणी योगचा थरार पाहता आला. मात्र यापैकी राजस्थानमध्ये साजरा झालेला योग डे गिनीज बुकमध्ये नोंद केला जाणार आहे. राजस्थानमध्ये साजरा झालेल्या योगदिनात  सहभागी झालेल्या लोकांचा आकडा ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल. कारण एकाचवेळी दीड लाखाहून अधिक लोकांनी एकत्र येत पहिल्यांदाच योग केला आहे.

रामदेवबाबांच्या मार्गदर्शनाखाली योग

योग म्हटलं की, रामदेवबाबा यांचे नाव आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते. राजस्थानमधील कोटामध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता योग शिबीराला सुरुवात झाली यावेळी १५ विविध आसने शिबिरातील लोकांकडून करुन घेतली गेली. गिनीज बुकात नोंद करताना येथील संख्या साधारण दीड लाखांच्या घरात होती. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पाहता पाहता हा आकडा २ लाखांवर पोहोचला.

ड्रोनची घेतली मदत

इतक्या मोठ्या संख्येने या शिबीराला लोकांची हजेरी होती की, हे सगळं शूट करण्यासाठी चक्क ड्रोनची मदत घ्यावी लागली. ही विहंगम दृश्य पाहिल्यानंतर या शिबीरातील गर्दीचा अंदाज येतो.

या आधीही गिनीज बुकात नोंद

इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येत योगा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी म्हैसूरमध्ये ५५ हजार ५२४ लोकांनी एकत्र येत गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद केली होती. त्यापुढे जात राजस्थानने हा आकडा लाखांच्याही पुढे नेला आहे.

#Rajasthan: Around 1.05 lakh (still counting) people perform Yoga together in Kota to create a Guinness World Record on #InternationalYogaDay2018. Yoga guru Ramdev and Chief Minister Vasundhara Raje Scindia present. pic.twitter.com/ytkVju79Kp

— ANI (@ANI) June 21, 2018

First Published on: June 21, 2018 3:44 PM
Exit mobile version