दहशतवादी – ड्रग्स तस्करांविरोधात NIA मोठी कारवाई; दिल्ली, पंजाबसह या चार राज्यांत छापेमारी

दहशतवादी – ड्रग्स तस्करांविरोधात NIA मोठी कारवाई; दिल्ली, पंजाबसह या चार राज्यांत छापेमारी

नवी दिल्ली : दहशतवादी आणि ड्रग्स तस्करांच्या वाढत्या कुरपतींविरोधात NIA ने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने (National Investigation Agency) मंगळवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआरमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने दहशतवादी, गँगस्टर, भारत आणि परदेशातील ड्रग्स तस्करांच रॅकेट उद्धस्त केले आहे.

एनआयएचे हे छापे दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील 40 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, ज्यामध्ये अनेक पथके सहभागी आहेत. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी एनआयएने ड्रोन डिलीव्हरी प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यासह अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले होते.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. गेल्या नऊ महिन्यांत सुरक्षा दलांनी शेजारच्या पाकिस्तानमधून 191 ड्रोन भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे घुसल्याचे पाहिले आहे, ज्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चिंता निर्माण झाली आहे. दहशतवादी ड्रग्स तस्करांसह मिळून भारताविरोदात कट रचत असल्याचा एनआयएला संशय आहे. यामुळे एनआयएने ही कारवाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बहुतेक छापे हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये टाकण्यात आले आहेत. दिल्लीतील रेड बवाना परिसरातील नीरज बवानाच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. ही छापेमारी टॉप मोस्ट गँगस्टरवर टाकलेल्या छाप्याचा दुसरा भाग आहे. नीरज बवाना, बॉम्बे गँग, लॉरेन्स बिश्नोई गँग, नासिर, छेनू, गोगी, काला जेठेडी आणि गोल्डी ब्रार यांच्यासह इतर सर्व गँडस्टरच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. या गँडस्टरचे साथीदारही एनआयएच्या रडारवर आहेत.


…तर मीसुद्धा उसतोड कामगार होईन, चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र


First Published on: October 18, 2022 11:58 AM
Exit mobile version