भारतासारख्या देशात लागू केलेल्या ‘Night Curfew’ला कोणताही वैज्ञानिक आधार नाही – WHO

भारतासारख्या देशात लागू केलेल्या ‘Night Curfew’ला कोणताही वैज्ञानिक आधार नाही – WHO

भारतासारख्या देशात लागू केलेल्या 'Night Curfew'ला कोणताही वैज्ञानिक आधार नाही - WHO

ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून,देशभरात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले आहे.मात्र भारतासारख्या देशात लागू केलेल्या या नाईट कर्फ्यूला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले आहे. या नाईट कर्फ्यूबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ.सौम्या स्वामिनाथन यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘या नाईट कर्फ्यूला कोणताही वैज्ञानिक आधार नसून, सर्वात आधी शाळा सुरु करण्यात व्हाव्यात,असे मत सौम्या यांनी CNBC-TV18 शी बोलताना व्यक्त केलं आहे.

भारतात काही ठिकाणी लागू केलेला नाईट कर्फ्यू कितपत प्रभावी ठरेल,याचे अद्यापही कोणतेही पुरावे नाहीत.मास्क आणि लसीकरण कोरोनावर मात करण्यासाठी आपली भूमिका बजावत आहे.जर ९० टक्के नागरिकांनी पूर्णवेळ मास्क लावला तर या कोरोनाला आळा बसेल. त्यामुळे कोरोना महामारीत नियमावलीचे पालन करुन प्रत्येकानेच दक्षता घेणे गरजेचे आहे.या सावधानतेमुळे तुम्ही कोरोनावरच नाहीतर, इतर आजारांवरही मात करु शकता.

याशिवाय राजकीय नेत्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य तो वैज्ञानिक पद्धतीचा विचार करावा. मात्र लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांसहित संपूर्ण देशाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी निर्बंध लावताना सामान्य नागरिकाचा विचार करावा.

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवणे गरजेचे आहे.मात्र,याशिवाय शाळा बंद असल्याने शाळकरी मुले मोबाईलच्या आहारी जात असून,त्यांच्यावर वाईट परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करताना सुरुवातीला शाळासुद्धा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, असे मत सौम्या स्वामिनाथन यांनी मांडले आहे.


हे ही वाचा – मुंबईत १५ जानेवारीपर्यंत जमावबंदी; ‘या’वेळेत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी


 

First Published on: December 31, 2021 8:21 PM
Exit mobile version