देशात गेल्या 24 तासांत 9,436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 9,999 रूग्ण कोविडमुक्त

देशात गेल्या 24 तासांत 9,436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 9,999 रूग्ण कोविडमुक्त

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या 24 तासांत 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.93 टक्के इतका आहे. तर, या कालावधीत 9 हजार 999 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 86 हजार 591 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.19 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 999 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 37 लाख 93 हजार 787 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.62 टक्के इतका आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.93 टक्के इतका असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.70 टक्के इतका आहे. आतापर्यंत 88.50 कोटी चाचण्या घेण्यात आल्या. तर, गेल्या 24 तासांमध्ये, 3,22,551 इतक्या चाचण्या घेण्यात आल्या.

आतापर्यंत 211.66 कोटी लसीकरण
देशव्यापी कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. राष्ट्रव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 211.66 कोटी लसमात्रा (94.18 कोटी दुसरी मात्रा आणि 15.20 कोटी खबरदारीची मात्रा) देण्यात आल्या आहेत. देशभरात 2,82,08,570 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. गेल्या 24 तासांमध्ये 26,53,964 इतक्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 4.02 कोटींहून अधिक (4,02,51,855) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 201.21 कोटी (2,01,21,42,325) लसीच्या मात्रा विनामूल्य आणि थेट राज्य अधिग्रहण श्रेणीच्या माध्यमातून पुरवल्या आहेत. 6.29 कोटीहून अधिक (6,29,02,190) शिल्लक आणि न वापरलेल्या कोविड प्रतिबंधक लसमात्रा अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.

First Published on: August 28, 2022 2:09 PM
Exit mobile version