अभिनंदन करायला लाज वाटते, धुलाईशिवाय पर्याय नाही – गडकरी

अभिनंदन करायला लाज वाटते, धुलाईशिवाय पर्याय नाही – गडकरी

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी नितीन गडकरी चांगलेच संतापले होते. इमारत निर्मितीला विलंब झाल्याने गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलच सुनावलं.

केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं नितीन गडकरी यांनी उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले. अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. परंतु आज मला तुमचं अभिनंदन करावसं वाटत नाही आहे. कारण २००८ मध्ये अशा पद्धतीची इमारत उभारण्यात, असं निश्चित झालं होत. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम तब्बल नऊ वर्षांनंतर पूर्ण झालं आहे. या ९ वर्षांच्या काळात तीन सरकार आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज या इमारतीचं काम पूर्ण झालं आहे. सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाही आहे. मात्र ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलं आहे, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा, असा टोला गडकरींनी लगावला.

दिल्ली-मुंबई महामार्ग ८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा हा महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतोय. या कामाला तीन साडेतीन वर्ष जर लागणार असतील आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी जर नऊ वर्ष लागली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. या गोष्टीची मला लाज वाटतेय, असं नितीन गडकरी म्हणाले.

 

First Published on: October 26, 2020 4:34 PM
Exit mobile version