सीमला आधारची गरज नाही !

सीमला आधारची गरज नाही !

(फोटो प्रातिनिधीक आहे.)

आधार नसल्यास ५० कोटी सिमकार्डधारकांना केवायसी (KYC) संबंधित समस्येला सामोरं जावं लागणार, किंवा त्यांचे सीमकार्ड बंद होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता घाबरण्याचं काहीही कारण नाही. कारण, देशातील कोट्यावधी सीमधारकांना UIDIAनं मोठा दिलासा दिला आहे. आता आधार व्हेरिफिकेशनशिवाय सीमकार्ड बंद होणार नाही असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे. दूरसंचार विभाग आणि UIDIAनं तशी शक्यता फेटाळून लावली आहे. आधार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोबाईल सीमकार्डची होणारी पडताळणी ही ग्राहकांसाठी ऐच्छिक असेल. तसेच आधार व्हेरिफिकशन करून सुरू केलेले सीम बंद करण्याचे कोणतेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले नाहीत अशी माहिती देखील संयुक्त पत्रकामध्ये देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आधार संबंधीत सुनावणी झाली होती. त्यावेळी नवीन सीमकार्डसाठी आधार सक्तीचे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय, बँकांमध्ये देखील खाते खोलण्यासाठी आधार गरजेचे नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी नवीन सीमकार्डसाठी आधार द्याच असा तगादा दूरसंचार कंपनीकडून लावला जात होता. पण, न्यायालयाच्या निकालानंतर मात्र सीमसाठी आधार गरजेचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on: October 18, 2018 4:59 PM
Exit mobile version