सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही – केंद्र सरकार

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही – केंद्र सरकार

‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशींची गरज नाही. योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल’, असे गृह मंत्रालयाने संसदेत म्हटले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात अनेक शिफारशी केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही वीर सावरकर यांना भारत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. यासंदर्भात केंद्र सरकारला संसदेत आज एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसल्याचे म्हटले. याशिवाय अशा अनेक शिफारसी केंद्राकडे येत असतात. मात्र, पंतप्रधान कार्यालयात याबाबत निर्णय घेतला जातो आणि त्याबाबत राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवला जातो, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सावरकरांना भारतरत्न मिळावा, अशी भाजपचीच शिफारस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत केंद्रात शिफारस करु, असे म्हटले होते. आज केंद्रात असलेल्या भाजप सरकारने संसदेत सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी शिफारशीची गरज नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, भाजपने जाहीरनाम्यात भारतरत्नच्या शिफारसीवरुन शिवसेनेने भाजपवर आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून टीका केली होती. ‘भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे’, असे शिवसेनेने म्हटले होते.

First Published on: November 19, 2019 4:57 PM
Exit mobile version