नो हेल्मेट, नो पेट्रोल, मोहीम आता या शहरातही

नो हेल्मेट, नो पेट्रोल, मोहीम आता या शहरातही

ज्या टू व्हिलर रायडरकडे हेल्मेट नाही, त्याला पेट्रोल नाही अशीच मोहीम सध्या कोलकाता पोलिसांनी सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे बाईकवरील सह प्रवाशाकडे हेल्मेट नसले तरीही पेट्रोल मिळणार नाही असे कोलकाता पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नो फ्यूएल, नो हेल्मेट असे कॅम्पेन सध्या कोलकाता पोलिसांनी येत्या ८ डिसेंबर ते ५ फेब्रुवारी दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधीच अशाच स्वरूपाचे कॅम्पेन हे नॉयडा, अलिगड आणि बंगळुरू येथे राबविण्यात आले आहे. ज्या टू व्हिलर रायडरकडे हेल्मेट नसेल त्याला पेट्रोल देऊ नका असे स्पष्ट आदेश कोलकाता पोलिसांनी पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.

कोलकात्यामधील पेट्रोल पंप चालकांनीही या कॅम्पेनचे स्वागत केले आहे. पण त्याचवेळी पोलिसांच्या मदतीशिवाय अशा मोहिमा यशस्वी करण्यासाठी अनेक आव्हाने येतात असेही त्यांनी सांगितले आहे. म्हणूनच पोलिसांनी या मोहिमांसाठी मदत करावी अशी मागणी पेट्रोलपंप चालकांनी केली आहे. कोलकात्यामध्ये १८ लाख वाहनांपैकी अर्धी वाहने ही बाईक म्हणून नोंद आहे. 2019 अखेरीस ९३ हजार बाईक्सची नोंद कोलकात्यामध्ये आहे. वाहनांच्या नियमभंग प्रकरणात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद बाईकस्वारांकडून हेल्मेट न वापरण्यांची आहे. तसेच प्रत्येक तीन प्रकरणात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल होतो. एकुण ३२ हजार ६०० प्रकरणांमध्ये टू व्हिलरच्या गुन्ह्यांची नोंद ही सर्वाधिक आहे.

पोलिसांकडून २०१७ दाखल झालेल्या एकुण ९६ हजार गुन्ह्यांच्या प्रकरणात जवळपास ११ हजार प्रकरणे ही हेल्मेट न घातल्याची होती. तर २०१९ मध्ये याच गुन्ह्यांची संख्या ही २१ लाखांवर गेली असून त्यामध्ये ६० हजार प्रकरणात बाईकस्वार हे हेल्मेटचा वापर करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


 

 

 

First Published on: December 5, 2020 3:28 PM
Exit mobile version