आयआयटी कानपूरमध्ये नाईट आऊटवर बंदी

आयआयटी कानपूरमध्ये नाईट आऊटवर बंदी

प्रातिनिधिक फोटो

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे आणि परिक्षेत यश संपादन करावे यासाठी आयआयटी कानपूरने विद्यार्थ्यांच्या नाईट आऊटवर बंदी घातली आहे. रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्टीत मुले अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या सीनेट मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या विद्यार्थांवर कडक कारवाई करण्यात येईल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आयआयटी-के चे रजिस्ट्रार के के तिवारी यांनी सांगितले की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी घेतला गेला आहे. दरम्यान संस्थेच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

आयआयटीत शिकणारे विद्यार्थी चाबुपर, बिथूर आणि अन्य विभागात लेट नाईट पार्टीसाठी जातात. या पार्टीत मुलांसोबतच मुलींचाही समावेश आहे. या ठिकाणांवर जाण्यासाठी विद्यार्थी खाजगी टेम्पोने जातात. वस्तीगृहातील अधिकाऱ्यांना सुचित न करता ही मुले पळ काढतात. कॅम्पस बाहेरील लोकांकडून यामुलांना अंमली पदार्थ सेवनासाठी दिले जातात. यामुळे मुले नशेच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे ही परिक्षण केले जाण्याचा मुद्दाही सिनेट मिटिंगमध्ये मांडण्यात आला. यापुढे रात्री आपल्या वस्तीगृहाच्या रुममध्ये नआढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

“आम्ही सुजाण मुले आहोत. ही बंदी आम्हाला मान्य नाही. लवकरच आम्ही ही बंदी उठवण्या बाबत आयआयटी प्रशासनाची बोलू”- विद्यार्थी

First Published on: July 11, 2018 10:21 PM
Exit mobile version