नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मोदींची घेतली भेट

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मोदींची घेतली भेट

अर्थतज्ज्ञ अभिजीत बनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजीत बनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीत बनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे म्हणाले होते. या वक्तव्यावरून बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे तसंच विरोधी पक्षांच्या प्रभावाखाली असल्याचे आरोप भाजपाने केले. याच पार्श्वभूमीवर आज बॅनर्जी पंतप्रधान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो ट्विवर शेअर केला आहे. तसंच या भेटीबद्दल मोदी असं म्हणाले आहेत की, ‘नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी माझी भेट झाली. मानवी विकास कौशल्याची त्यांची आवड दिसून येते. आमची विविध विषयांवर चर्चा झाली. त्याच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. त्यांच्या पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’

काँग्रेसला २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘न्याय योजना’ हा वचननामा तयार करण्यासाठी अभिजीत बनर्जी यांनी मदत केली होती. म्हणून जागतिक गरिबी या विषयावर संशोधन केल्यामुळे बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सध्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे म्हटल्यामुळे अभिजीत बॅनर्जी यांच्या भाजपाच्या नेत्यांनी टीका केली होती. ‘बॅनर्जी यांचे विधान चुकीचे आहे. ते डाव्या विचारसरणीचे आहे. त्यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचे कौतुक केले होते. पण हिच योजना अपयश ठरली आहे’, असं म्हणतं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्या टीका केली होती.

भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतील प्रतिष्ठीत मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. कोलकता विद्यापीठातून बॅनर्जी यांनी १९८१ साली बीएससी केलं आहे तर १९८३ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू मधून एमए पूर्ण केलं आहे.

First Published on: October 22, 2019 1:02 PM
Exit mobile version