रसायनशास्त्रातील तीन दिग्गजांना नोबेल पुरस्कार जाहीर

रसायनशास्त्रातील तीन दिग्गजांना नोबेल पुरस्कार जाहीर

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी (सौजन्य-इंस्टाग्राम)

अमेरिकेचे शास्त्रज्ञ फ्रांसेस अर्नोल्ड, जॉर्ज स्मिथ तसेच ग्रेगरी विंटर यांची रसायनशास्त्र विभागातील नोबेल पुरस्काराकरता निवड झाली आहे. सोमवारपासून जागतिक स्तरावरील विविध विभागांमधील नोबेल पुरस्काराची घोषणा होत असून आज रसायनशास्त्र विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्मिथ आणि विंटर यांना प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. तर अरनॉल्ड यांना प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. अशापद्धतीने तयार केलेले एन्झामाईन जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील.

अर्नोल्ड पुरस्कार मिळालेल्या पाचव्या महिला 

अर्नोल्ड रसायनशास्त्र विभागात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पाचव्या महिला आहेत. त्यांना पुरस्कारातील ९० लाख स्वीडिश क्रोनोर म्हणजेच साधारण १० लाख डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. तर उर्वरित रक्कमा स्मिथ आणि विंटर यांना दिली जाणार आहे. स्वीडिश रॉयल अॅकॅडमी ऑफ सायन्स यांच्या मते रसायन विज्ञान क्षेत्रातील २०१८ चा नोबेल पुरस्कार हा प्रगतीच्या वापरावर आधारीत आहे. ज्या संशोधनाने मानवाला मोठा फायदा होणार आहे. सजीवांच्या शरिरात निर्माण होणारे द्रव्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांबाबत महत्त्वपूर्ण संशोधनासाठी फ्रान्सिस अर्नोल्ड यांना नोबेल जाहीर झाला आहे. फ्रान्सिस यांच्या संशोधनामुळे पर्यावरणपूरक रसायनांच्या निर्मितीलाही हातभार लागला आहे. त्यात औषधे तसेच इंधनांचाही समावेश आहे.

First Published on: October 3, 2018 7:55 PM
Exit mobile version