वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

जेम्स पी एलिसन और तासुकू होंजो (सौजन्य- लोकमत)

वैद्यकीय आणि मानसशास्त्र क्षेत्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. आजपासून नोबेल पुरस्काराच्या घोषणांची सुरूवात करण्यात आली असून यापुढे प्रत्येक क्षेत्रातील पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीमध्ये सोमवारी २०१८ च्या मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांची निवड करण्यात आली.

First Published on: October 1, 2018 6:08 PM
Exit mobile version