अल्पवयीन मुलाने सेक्सला नकार दिला म्हणून तीने त्याच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ला चटका दिला!

अल्पवयीन मुलाने सेक्सला नकार दिला म्हणून तीने त्याच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ला चटका दिला!

अत्याचार

दिल्ली जवळील ग्रेटर नोएडा येथे एका महिलेवर सेक्सला नकार दिलाम्हणून अल्पवयीन मुलाचा प्रायव्हेट पार्टला चिमट्याचे चटका दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  छपरौला गावची रहिवासी असलेल्या महिलेने १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने त्याच्याकडे बोलावले आणि त्याचा लैगिंक छळ केला. जेव्हा या मुलाने लैंगिक संबंधाला नाकारला दिला. तेव्हा तीने चिमटा गरम केला आणि त्याच्या खासगी भागावर चटके दिले.

पोलिसांनी सांगितले की,  अल्पवयीन मुलाच्या आईने म्हटले आहे की आरोपी महिलेने  माझ्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की,  २५- ३० वर्षांच्या या महिलेने संध्याकाळी अल्पवयीन मुलाला अमिष दाखवून घरी बोलवले. त्यावेळी ती तिच्या घरी एकटी होती.

याप्रकरणी मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये हत्याराचा वापर करत मुलाला जखम करणे, मुलाचे अपहरण करणे आणि गुन्हेगारीशी संबंधित अनेक आरोप या महिलेवर लावण्यात आले आहेत. आरोपी महिलेविरूद्ध पीओसीएसओ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंसेज) अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. घटनेपासून आरोपी महिला फरार आहे.


हे ही वाचा – सावधान! सेक्स केल्यामुळे होतोय कोरोना…


 

First Published on: May 13, 2020 10:35 PM
Exit mobile version