US OPEN : जोकोव्हिचवर शिस्तभंगाची कारवाई, स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात!

US OPEN : जोकोव्हिचवर शिस्तभंगाची कारवाई, स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात!

नोव्हाक जोकोव्हिच

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचवर शिस्तभंगाची कारावी करण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हाकचं सुएस ओपन स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. नोव्हाक जोकोव्हिचने महिला लाईन्समनला चेंडू मारल्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. जोकोव्हिचने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

या घटनेमुळे जोकोव्हिचला प्री क्वार्टर फायनल सामन्यातच आपला गाशा गुंडाळावा लागला. जोकोव्हिचने आतापर्यंत १७ ग्रॅडस्लॅम जिंकले आहेत. स्पेनचा पाब्लो कारेनो बुस्टा याच्यासोबत नोव्हाक जोकोव्हिच याचा प्री क्वार्टर फायनलमधील सामना रंगला होता. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ५-६ ने पिछाडीवर होता.

 

काय घडलं नेमकं

सामना रंगत असतानाच जोकोव्हिचने मारलेला एक चेंडू महिला लाईन्समनला लागला. चेंडू त्या महिला अधिकाऱ्याच्या लागला आणि ती कोसळली. अचानक चेंडू लागल्यामुळे त्या महिला आधिकाऱ्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. चेंडू लागल्यानंतर जोकोव्हिचने त्या महिला आधिकाऱ्याकडे तातडीने धाव घेतली. जोकोव्हिचने तिची विचारपूसही केली. काही वेळानंतर ती स्वत: उठून उपचारांसाठी टेनिस कोर्टाबाहेर गेल्या.

या घटनेनंतर सामना १० मिनिटं थांबवण्यात आला. अंपायने सामनाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर कोरेनो बुस्टा या विजयी घोषित केलं. जोकोव्हिचवर शिस्तभंगाची कारवाई झाल्यानंतर जगभरातून त्याला पाठिंबाही मिळत आहे तर काहींनी त्याच्यावर टीकाही केली आहे.

First Published on: September 7, 2020 10:06 AM
Exit mobile version