आता Whatsapp वरुनही करु शकता लसीसाठी स्लॉट बुक, जाणून घ्या कसे?

आता Whatsapp वरुनही करु शकता लसीसाठी स्लॉट बुक, जाणून घ्या कसे?

WhatsApp Update : २० लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअप बंद, नेमकं कारण काय?

देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम अधिक वेगाने सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आता तुम्ही Whatsapp वरुनही देखील लसीसाठी स्लॉट बुक करु शकणार आहात. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भातीव घोषणा केली आहे. यापूर्वी नागरिकांना केंद्र सरकारच्या अॅपमधूनचं लसीसाठी स्लॉट बुक करता येत होता. तर अनेक लसीकरण केंद्रांवर रजिस्ट्रेशन करत थेट लस घेण्याची सुविधा दिली जात होती. मात्र आता Whatsapp वरुन लसींचा स्लॉट बुक करण्याची सुविधा मिळाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

सध्या कोव्हिन अॅपच्या माध्यमातून लसीचा स्लॉट बुक करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.  स्लॉट बुक करण्यासाठी अनेक वेळ देऊनही स्लॉट मिळवत नव्हता.यामुळे सरकारने आता Whatsapp वरुनचं थेट लसीचा स्लॉट बुक करण्याची सुविधा दिली आहे. यामाध्यमातून केंद्र सरकार कमीत कमी वेळेत सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कसा कराल Whatsapp वरुन लसीचा स्लॉट बुक?

१) Whatsapp वरुन लसीचा स्लॉट बुक करण्यासाठी केंद्र सरकारने 919013151515 हा नंबर जाहीर केला आहे.

२) लस घेणाऱ्या व्यक्तीला या नंबरवर स्लॉट बुक असं लिहून तो MyGovIndia Corona Helpdesk या कोरोना हेल्पडेक्सवर पाठवावा लागेल.


ना शिक्षण, ना ही कसले ट्रेनिंग, तालिबानी बनला अफगाण बँकेचा हेड

First Published on: August 24, 2021 3:41 PM
Exit mobile version