लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु

लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु

लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या 'ब्रेकथ्रू इंफोक्शन'चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जगभरातील देश अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही डोस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे जगभरात कोरोनाविरोधातील प्रभावी लसीचा शोध सुरु आहे. अशातच लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका वाढतोय अशी माहिती समोर आली आहे. ब्रेकथ्रू इंफेक्शनसाठी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटला जबाबदार धरले जात आहे.

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनवर आधारित लसींना अधिक प्रभावी बनवण्यासाठी उंदरांवर प्रयोग केला. या स्पाइक प्रोटीनवर आधारित लसीमध्ये त्यांनी एक नवा अँटीजन मिसळवला. या अँटीजनला ‘न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीन’ असे म्हटले जाते. यावर संशोधकांचे असे म्हणणे आहे की, स्पाइक प्रोटीनच्या तुलनेत ही लस इम्यून सिस्टमला अधिक वेगाने सक्रिय करते.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरोधात कोणती लस ठरतेय प्रभावी?

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक पाब्लो पेनालोजा मॅकमास्टर यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरोधात कोणती लस प्रभावी ठरु शकते यावर संशोधन सुरु आहे. यात न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीन लसीमध्ये मिक्स केल्यास कोरोनाच्या ब्रेकथ्रू इंफोक्शन’वर ही लस अधिक प्रभावी ठरु शकते. उंदरांवर केलेल्या प्रयोगात ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरोधातही प्रभावी ठरतेय. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना होणाऱ्या संक्रमणास ‘ब्रेकथ्रू इंफेक्शन’ असे म्हटले जाते.

ब्रेकथ्रू इंफेक्शन’विरोधात स्पाइक प्रोटीनवर आधारित वॅक्सिन आणि अतिरिक्त अँटीजनयुक्त वॅक्सिनच्या प्रभावासंदर्भात हे पहिले संशोधन आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या सामान्य नागरिकांमध्ये ‘ब्रेकथ्रू इंफेक्शन’चा दर १ टक्के इतका आहे.

कमी रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना सर्वाधिक धोका

कॅन्सर, एचआयव्ही, ऑटोइम्यून आजार, अवयव प्रत्यारोपण, आणि किडणीसंबंधीत गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना ‘ब्रेकथ्रू इंफेक्शन’चा धोका अधिक आहे. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती बाहेरील संक्रमणापासून वाचण्यासाठी कमजोर ठरतेय.


 

First Published on: August 23, 2021 12:08 PM
Exit mobile version