एनएसयूआय कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना

एनएसयूआय कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना

दिल्ली विद्यापाठीत काँग्रेसप्रणित ‘नॅशनल स्टूडंट्रस युनियन ऑफ इंडिया’च्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला काळोख फासले. याशिवाय त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला चपलीचा हार घातला. त्यामुळे दिल्ली विद्यापीठातील वातावरण तापले आहे. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या पुढाकाराने दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, सावरकरांच्या पुतळ्यावर एनएसयूआयने आक्षेप घेतला आणि या आक्षेपातून त्यांनी सावकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. याप्रकरणी एबीवीपीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांचे पुतळे दिल्ली विद्यापीठाच्या आवारात बसवण्यात आले होते. मात्र, एनएसयूआयला सावरकरांच्या पुतळ्यावर आक्षेप होता. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातवरण होते. अखेर गुरुवारी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. याशिवाय ‘भगतसिंग अमर रहे’ आणि ‘बोस अमर रहे’ अशी घोषणाबाजी केली. या कृत्याचा कार्यकर्त्यांनी व्हिडिओ देखील बनवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

First Published on: August 23, 2019 2:31 PM
Exit mobile version