पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘INS अरिहंत’चा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘INS अरिहंत’चा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाची पहिली अणवस्त्रवाहक पाणबुडी म्हणजे आयएनएस अरिहंत. आयएनएस अरिहंतने आज ( सोमवार ) आपली पहिली गस्ती मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस अरिहंत पाणबुडीवरील कर्मचाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना अरिहंतचा अर्थ शत्रूला नष्ट करणे असा आहे. शत्रूला आणि शांततेविरोधात कारवाया करणाऱ्यांना ही पाणबुडी खुले आव्हान आहे. आयएनएस अरिहंत ही सव्वाशे कोटी भारतीयांच्या सुरक्षेची हमी असल्याचे गौरोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरिहंत बद्दल बोलताना काढले.

कशी आहे INS अरिहंत?

INS अरिहंतमध्ये जमीन, पाणी आणि आकाशातून हल्ला करण्याची ताकद आहे. भारताच्या ताफ्यात जमिनीवरून लांब पल्ल्यातील लक्ष्यभेद करणारी क्षेपणास्त्र आणि अणू हलल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम अशी लढाऊ विमानं देखील आहेत. INS अरिहंत ही पाण्याखालील अण्वस्त्र हल्ल्याचा शोध घेऊन त्याला जशास तसे उत्तर देऊ शकते. त्यामुळे भारताची ताकद आता वाढली आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील राष्ट्रांमध्ये अण्वस्त्रांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना देशामध्ये विश्वसनीय अण्वस्त्र क्षमता निर्माण करणे गरजेचं असल्याचं म्हटलं. त्यांचा प्रामुख्यानं रोख हा पाकिस्तान आणि चीनच्या दिशेनं होता. तसेच अरिहंतमुळे आपला देश शत्रुच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. तसेच INS अरिहंत भविष्यातील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताच्या वाकड्यात कोणी जात नाही आणि कोणी गेला तर त्याला सोडत देखील नाही असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. शांती, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी आपली अण्वस्त्र क्षमता खूप महत्त्वाची आहे असं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

First Published on: November 5, 2018 7:26 PM
Exit mobile version