‘या’नर्सने केवळ अंतर्वस्त्रांवर घातले पारदर्शी पीपीई किट

‘या’नर्सने केवळ अंतर्वस्त्रांवर घातले पारदर्शी पीपीई किट

'या'नर्सने केवळ अंतर्वस्त्रांवर घातले पारदर्शी पीपीई किट

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून जगात आकडा आता ५० लाखांवर गेला आहे. या कोरोनाशी सामना करण्याकरता डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सध्या एका नर्सचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एका रुग्णालयात कोरोनाबाधित पुरुषांच्या वॉर्डमध्ये रुग्णसेवा देतानाचा हा फोटो असून या नर्सने अंतर्वस्त्रांवर केवळ पारदर्शी पीपीई किट घातले आहे. या नर्सने पीपीई किट घालण्यापूर्वी स्वत:चे कपडे परिधान केले नव्हते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता या नर्सवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

रशियातील टुलामधील एका रुग्णालयात एका २० वर्षीय परिचारिकेने पीपीई खाली केवळ अंतर्वस्त्रं घातली होती. या परिचारिकेकडे पुरुष वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही नर्स ज्यावेळी वॉर्डात आली त्यावेळी या नर्सचा रुग्णांपैकी कोणीतरी फोटो काढला आणि त्यानंतर तो अल्पावधीतच व्हायरल झाला. दरम्यान, वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक गणवेश परिधान न केल्याने संबंधित नर्सवर रुग्णालय प्रमुखांनी कारवाई केली आहे.

विचारणा केली असता म्हणाली की…

या नर्सला याबाबत विचारणा केली असता तिने ‘पीपीईमध्ये गरम होत असून कोरोना वॉर्डमधील रुग्णांच्या चाचणीसाठी परिधान केलेले पीपीई किट इतके पारदर्शक असेल असे वाटले नव्हते’, असे तिने वैद्यकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना सांगितले आहे.


हेही वाचा – भारतात २४ तासांत ५ हजार ६०९ नवे कोरोना रुग्ण; १३२ जणांचा मृत्यू


 

First Published on: May 21, 2020 7:05 PM
Exit mobile version