ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांना भेडसावतोय एकटेपणा, मानवी स्पर्शाचा डिस्पोजेबल ग्लव्ह्ज इंटरनेटवर गाजतोय

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांना भेडसावतोय एकटेपणा, मानवी स्पर्शाचा डिस्पोजेबल ग्लव्ह्ज इंटरनेटवर गाजतोय

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांना भेडसावतोय एकटेपणा, मानवी स्पर्शाचा डिस्पोजेबल ग्लव्ह्ज इंटरनेटवर गाजतोय

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढतेय. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या रुग्णांना बिकट परिस्थितीतून जावे लागतोय. यात ब्राझीलमधील कोरोना स्थिती अतिशय भयंकर आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवत वावरावे लागतेय. यामुळे गरजू कोरोना संक्रमिकव्यक्तींना मदत करणेही कठीण होते. परंतु ब्राझीलमधील एका नर्सने कोरोना संक्रमिक व्यक्तीच्या मदतीसाठी नवीन शक्कल लढवली आहे. या नर्सने कोरोनाबाधित रुग्णाचा एकटेपणा घालण्यासाठी डिस्पोजेबल ग्लब्समध्ये गरम पाणी भरत ते ग्लव्स रुग्णाच्या दोन्ही हातांवर बांधले आहेत. यामुळे कोरोना संक्रमित रुग्णाला आर्टिफिशियल ह्यूमन टच मिळेल आणि एकटेपणा जाणवणार नाही.

याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गल्फ न्यूजच्या सादिक समीर भट्ट यांने हे फोटो शेअर केले होते. याफोटोसह अशी कॅप्शन लिहिली की, देवाची कृपा, एका नर्सने आयसोलेटेड वॉर्डमध्ये उपचार घेत असणाऱ्या कोरोना संक्रमिक रुग्णाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दोन डिस्पजेबल ग्लव्समध्ये गरम पाणी भरले आणि ते रुग्णाच्या हाताला बांधले. फ्रंटलाईन वर्कर्सला सलाम. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक युजर्सने तुफान लाईक्स आणि भरभरून कमेंटस केल्या आहेत.

ब्राझीलमध्ये फेब्रुवारी २०२० नंतर पहिल्यांदाच या आठवड्यात ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी कोरोना संक्रमणामुळे ४,१९५ रुग्णांचा मृत्यू ब्राझीलमध्ये झाला. तर आत्तापर्यंत तब्बल ३ लाख ३७ हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू एकट्या ब्राझीलमध्ये झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असतानाही ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी लॉकडाऊन न लावण्याची घोषणा केली. त्यांनी जाहीर केले की, ब्राझीलमध्ये कोणताही देशव्यापी लॉकडाऊन लागणार नसून सैन्य नागरिकांना घरीच ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार नाही. त्यामुळे ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतोय.


 

First Published on: April 9, 2021 11:38 AM
Exit mobile version